कर्मयोगी आबासाहेब काकडे हेच दिन दलित, कष्टकऱ्याचे कैवारी-मुख्याध्यापक हनुमान गोर्डे
कर्मयोगी आबासाहेब काकडे यांचा पुण्यस्मरण सोहळा
पाथर्डी प्रतिनिधी:
कर्मयोगी आबासाहेब काकडे यांचा ४७ वा पुण्यस्मरण सोहळा भालेश्वर विद्यालयात उत्साहात साजरा झाला. यावेळी उपस्थित मान्यवराच्यां शुभहस्ते कर्मयोगी आबासाहेब काकडे ,निर्मलाताई काकडे व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमांचेपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री हनुमानजी गोर्डे यांनी कर्मयोगी आबासाहेब काकडे यांचा सविस्तर जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. कर्मयोगी आबासाहेब हेच कष्टकरी दिन दलितांचे कैवारी होते असे अध्यक्षांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. यावेळी जेष्ठ शिक्षक श्री. आप्पासाहेब ढगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
या कार्यक्रमास उपस्थित ज्येष्ठ शिक्षक श्री. दिगंबर नजन, श्री. भाऊसाहेब शिंदे, श्री. गणेश लव्हाट, श्री.अरुण बैरागी, श्री. बाबासाहेब बर्डे, श्रीमती सुनीता भालेराव, श्रीमती रेखा आढाव, श्री. सुनील जाधव, श्री. बंडू सुपेकर व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती खेडकर, सूत्रसंचालन विद्या खेडकर तर आभार पुनम खेडकर यांनी मानले.