स्व.दादापाटील राजळे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन
By Admin
दादापाटील राजळे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन.
सहकार महर्षी स्व. दादापाटील राजळे (भाऊ) यांच्या १०४ व्या जयंती निमित्त दादापाटील राजळे महाविद्यालय, आदिनाथनगर, ता. पाथर्डी येथे स्व. दादापाटील राजळे स्मृती व्याख्यानमालेचे गुरुवार दि. २० ऑगस्ट ते शनिवार २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजन केले आहे. व्याख्यानमालेचे हे २१ वे वर्ष आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी दिली. व्याख्यानमालेचे उद्घाटन मा. श्री. डॉ. प्रशांत साठे उपप्राचार्य, बी.एम.सी.सी. कॉलेज, पुणे यांच्या शुभहस्ते होणार असून ते स्क्रीन टाईम ते ग्रीन टाईम या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्या अध्यक्षतेखाली या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले जाणार आहे. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प प्रसिद्ध उद्योजक, वक्ता व लेखक श्री. बी. एन. धुमाळ यांच्या युवकांनो उद्योजक व्हा! या विषयावर व्याख्यान होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ संचालक श्री उद्धवराव वाघ हे असणार आहेत व्याख्यानमालेचा समारोप चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर सह्याद्री फार्म नाशिक, मा. श्री. विलास शिंदे यांच्या शेतीतील संधी व उद्योजकता या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. आ. श्री. अप्पासाहेब राजळे हे भूषवणार आहेत. या कार्यक्रमास मा. डॉ. हरिभाऊ मोरे मा. अधिष्ठाता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्व. सौ. चंद्रभागाबाई दादापाटील राजळे सर्व सेवाभावी संस्था आदिनाथनगर यांचे वतीने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार समारंभ होणार आहे. या कार्यक्रमासाठी बाबासाहेब किलबिले, राहुल दादा राजळे, सुभाषराव ताठे, गुलाबराव राजळे, शिवाजीराव राजळे, शिक्षण संस्थेचे सर्व विश्वस्त उपस्थित राहणार आहेत. तरी परिसरातील विद्यार्थी, पालक व नागरिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी केले आहे.
11316
10




