कासारपिंपळगाव येथील ग्रामस्थ पुरातून काढतात वाट
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पाऊस व पुरामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले.त्यात तालुक्यातील पाथर्डी तालुक्यातील कासारपिंपळगाव येथील कवळे वस्ती व घोडके वस्ती मिळून सुमारे दोनशे ते तीनशे लोक वस्ती असलेल्या या वस्तीवर तेथील लोकांना जाण्यास नदीवर पूल नसल्याने तेथील लोकांना आठ दिवस उलटले तरी अजूनही धोकादायक पुरातून वाट काढत जावे लागतेय.दहा वर्षांपूर्वी माजी जि.प.सदस्य शिवशंकर राजळे यांनी दोन्ही रस्ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण केले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी लोकप्रतिनिधीनी उदघाटन केलेल्या रस्त्याचं व पुलाच अजूनही काही झालेलं नाही.उद्घाटनाचे बोर्डही अजून तसेच आहेत.मागच्या आठवड्यात घोडके वस्ती पुलाची केलेली तात्पुरती डागडुजी पुढच्या पुरात पुन्हा वाहून गेली.कवळे वस्ती चे लोक तर धोकादायक पुरातून पायी जातात.तसेच हा रस्ता पारेवाडी,तिसगाव जाण्यासाठी गावातील मार्ग आहे.
तालुक्यात गाजावाजा करत फिरणाऱ्या व ग्रामपंचायत, जिल्हापरिषद,आमदार, तालुका लोक प्रतिनिधी महत्त्वाचे पद यासह सर्व सत्ता ताब्यात असणाऱ्या लोकप्रतिनिधी यांनी स्वतः च्या गावात असलेल्या अडचणी पण सोडवाव्यात ही गावातील जनतेची माफक अपेक्षा आहे.असे मत राष्टवादीचे नेते संदिप राजळे यांनी व्यक्त केले आहे.