बाबुजी आव्हाड महाविद्यालयात ऑनलाइन ऑडिओ भाषण स्पर्धा संपन्न
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी शहरातील पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या बाबुजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालय मध्ये शिक्षक दिनाच्या निमित्ताने इंग्रजी मध्ये ऑनलाईन ऑडियो भाषण स्पर्धांचे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या Thanks A Teacher अभियान अंतर्गत शिक्षक गौरव प्रित्यर्थ आयोजन करण्यात आले.
"इम्पॉर्टंट ऑफ टीचर इन कोविड 19 "या विषयावर विद्यार्थ्यांना ऑडियो क्लिप द्वारे इंग्लिश मध्ये स्पीच पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते.
कोरोनाच्या या परिस्थितीत शिक्षकांनी ई लर्निग द्वारे ज्ञान दानाचे कार्य निरंतर पद्धतीने चालू ठेवले आहे. शिक्षक हे वर्गात उपलब्ध नसले तरी शिक्षण अविरत पद्धतीने चालू आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकाची जागा हे तंत्रज्ञान घेऊ शकत नाही, परंतु शिक्षकांनी तंत्रज्ञानाला आपला सखा बनवले आहे, असे प्रतिपादन विद्यार्थ्यांनी केले.
सदर स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये प्रतीक्षा इंगवले हिने प्रथम, अर्चना गुठे द्वितीय तर गायत्री बांगर हिने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे आयोजन प्रा. मन्सूर शेख यांनी तर परीक्षण प्रा. सचिन पालवे यांनी केले.
पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, पर्यवेक्षक प्रा. शेखर ससाणे यांनी अभिनंदन केले.