अहमदनगर जिल्ह्यातील सकाळच्या ठळक बातम्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगरमधील माेहरमची मुख्य विसर्जन मिरवणूक शांततेत; शहर पाेलिसांनी केलेल्या नियाेजनाचे काेठला ट्रस्टी आणि यंग पार्ट्यांकडून काैतुक
उड्डाणपुलाच्या कामामुळे अहमदनगर शहरात वाहनांना प्रवेश बंदी राहणार; २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत रात्री १२ ते पहाटे सहा या वेळेत असणार निर्बंध
पारनेरच्या तहसीलदार ज्याेती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपची राज्यातील भाजप नेत्यांकडून दखल; देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांची देवरे यांना न्याय देण्याची मागणी
राहुरीतील देवळाली प्रवरा शहरात अद्ययावत क्रीडा संकुल उभारा; मुख्याधिकारी अजित निकत यांना खेळाडूंचे निवेदन
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर मार्गावर चालत्या माेटारीने पेट घेतला; सुदैवाने या घटनेत काेणतीही जीवितहानी नाही
अहमदनगर जिल्ह्यात काल ६५० जणांना काेराेना संसर्गाचे निदान; सर्वाधिक संगमनेरमध्ये १४४ जणांना काेराेना
नगर तालुक्यातील जेऊर परिसरात दाेन बिबट्यांचा वावर; मानवी वस्तीत घुसून पाळीव पशु-पक्ष्यांची शिकार सुरू
कारगिल युद्धाचे साक्षीदार कर्नल किसनराव काशिद यांचे निधन; लष्करातून निवृत्त झाल्यानंतर जिल्हा न्यायालयात वकील म्हणून कारकीर्द
पाथर्डीतील सुपुत्र कृषी सहायक ज्ञानेश्वर दाैंड यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान
अहमदनगर जिल्ह्यात सर्वदूर संततधार सुरू; पुढील दाेन आठवडे दमदार पाऊस राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज