अमरण उपोषण शिक्षकाचे अखेर मागे
नाशिक प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघाचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा( जिल्हा- नाशिक ) विद्यालयातील
चंद्रकांत महादु जाधव हे शिक्षक आपल्या मागण्यांसाठी दिनांक 2 ऑक्टोबर 2021 महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी दुपारी बारा वाजल्यापासून अमरण उपोषण करत होते.
त्यांचा मागण्यांची दखल घेऊन भारत सर्व सेवा संघ संस्थेचे सचिव श्री प्रकाश रावजी जाधव साहेब व संचालक श्री हनुमंत पाटील सर, इगतपुरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शिवरामजी झोले साहेब, कवडदरा येथील श्री रमेश भाऊ निसरड, श्री संपत भाऊ रोंगटे आदींच्या उपस्थितीत श्री चंद्रकांत जाधव सर यांनी आपल्या विविध मागण्यासाठी केलेले उपोषण मागे घेतले तसेच यावेळी संस्थेच्या सचिव श्री प्रकाशजी जाधव यांनी चंद्रकांत जाधव सर यांना विनाअनुदानित वरून अनुदानित वर बदली आदेश व कार्यमुक्ती आदेश दिला सदर बदली आदेश व कार्यमुक्ती आदेश घेऊन श्री जाधव सर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज टाकेद या ठिकाणी हजर होण्यासाठी गेले.
दुपारी साडेचार वाजता श्री जाधव सर हे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज टाकेद या ठिकाणी रुजू झाले आहेत.