पाथर्डी तालुक्यातील 'या' गावात भरदिवसा चोरी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी:मुलीच्या विवाहासाठी आणलेले तिन लाख रुपये रोख व सोळा तोळे सोन्याचे दागिने असा सात लाख ऐंशी हजार रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी दिवसा घराचे कुलुप तोडुन कपाटातुन चोरुन नेले आहेत. भालगाव येथे आंबादास रघुनाथ वारे ( वय ४३ )यांच्या घरात ही चोरी सोमवारी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेच्या दरम्यान झाली.शेतकरी शेतामधे गेले असता चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.