महाराष्ट्र
डोंगरी विकास योजनेतून मोहरी गावातील दोन रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन
By Admin
डोंगरी विकास योजनेतून मोहरी गावातील दोन रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील मोहरी गावातील मुलभूत समस्या ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांनी सोडवून ते पंचायत समितीचे सभापती असल्यापासून या गावातील सिंचन,रस्ते व इतर विकासकामे मार्गी लावले. या गावाशी पूर्वीपासूनच आमचे वेगळे नाते आहे.येत्या काळात तुमचा आशीर्वाद लाभल्यास भविष्यात परिसरातील सर्व प्रश्ने सोडवू, असे आश्वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॕड. प्रतापराव ढाकणे यांनी दिले.
राज्य शासनाच्या डोंगरी विकास योजनेतून मोहरी गावातील दोन रस्त्यांचे भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे होते.नगरसेवक बंडू पाटील बोरुडे,युवक तालुकाध्यक्ष महारुद्र कीर्तने,अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख अंबादास राऊत, माजी जि.प.सदस्य गहिनीनाथ शिरसाट,शहराध्यक्ष योगेश रासने ,जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे ,रंगनाथ वाघमोडे,तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र खेडकर,चंद्रकांत भापकर,राजेंद्र जगताप,महादेव दहिफळे,अनंत कराड आदी उपस्थित होते.
अॕड.ढाकणे म्हणाले,सन १९७२ सालापर्यंत मोहरीत यायला रस्ताही नव्हता.दुष्काळ काळात पंचायत समितीचे सभापती बबनराव ढाकणे यांनी लोकांच्या हाताला काम उपलब्ध व्हावे म्हणून खडीकरणाचा रस्ता दिला.तलावासाठी त्याकाळात अनेक गैरसमज ग्रामस्थांत होते.त्यात मध्यस्थी तत्कालीन पाटबंधारे मंत्री बी.जे.खताळ यांच्याकडून मोहरी तलावासाठी मंजुरी मिळविली, यामुळे परिसरातील शेतीसह पाथर्डी शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविला.आजही मोहरी व परिसरातील अनेक समस्या आहेत ते सोडविण्यासाठी तुमचा आशिर्वाद आवश्यक असून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करून डोंगरी विकास योजनेतून निधी मिळविला.तालुक्यातील अनेक गावे डोंगरी विकास योजनेसाठी पात्र आहेत, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे या योजनेचा लाभ या गावांना मिळू शकत नाही.परंतु येत्या काळात ही अडचण सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा सुरु असून लवकरच त्याबाबत निर्णय अपेक्षित आहे.
प्रास्ताविक महेश वाघमोडे यांनी केले तर आभार माजी सरपंच पोपट नरोटे यांनी मानले.
Tags :
247
10