आतिष नि-हाळी मित्र मंडळाच्या वतीने लसीकरण शिबीर
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्याचे प्रथम आमदार स्व.माधवरावजी नि-हाळी यांचे नातू आतिष नि-हाळी यांच्या वतीने व उपजिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने सोमवारी चौंडेश्वरी सांस्कृतिक भवन अष्टवाडा येथे लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मागील ५ ते ६ महिन्यापासून उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने जि.प.प्राथमिक शाळा येथे लसीकरण चालू आहे. परंतु तिथे मर्यादित डोस उपलब्ध होत असल्याने सर्वांचे लसीकरण होणे अशक्य होते.त्यामुळे आतिष नि-हाळी यांच्या प्रयत्नातून कोणीही लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून अष्टवाडा, आखारभाग,नाथनागर, सिनेमागल्ली,ढावारगल्ली,कासारगल्ली या विभागासाठी लसीकरण शिबीर घेण्यात आले.या शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. शिबिरात १८४ नागरिकांना कोविशील्ड व कोव्हक्सीन या लसीचा १ला व २ रा डोस देण्यात आला.
लसीकरण शिबिराचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाच्या लसीकरण पथक प्रमुख डॉ.सारीका विधाते यांच्या हस्ते करण्यात आले.उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने डॉ.सारीका विधाते,आरती डोंगरे,सुप्रभा शिंदे,मिना जगदाळे,छाया खेडकर, निलेश वराडे,कालिदास पवार,काय्युब शेख उपस्थित होते.
पाथर्डी नगरपालिकेच्या वतीने दत्तात्रय ढवळे, शिवाजी पवार,उत्तम गिरी,विनोद नि-हाळी,रशीद शेख हे उपस्थित होते, तर अष्टवाडा तरुण मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष आतिष नि-हाळी,विशाल नि-हाळी,अक्षय वराडे,ओम भालसिंग, आकाश भातोडे,प्रतीक वराडे,कुणाल खोजे,आकाश नि-हाळी,गणेश गर्जे,प्रसाद नि-हाळी,गणेश पारेकर,सिद्दराज खोजे,सुशांत मनेळ,नितीश नि-हाळी,ओम बडदे, श्रावण अडाणी यांच्या विशेष सहकार्य ने लसीकरण शिबिर यशस्वीरित्या पार पडले.