श्रीकृष्ण गोमाता शाळेत धनजंयभाई देसाई यांचा सत्कार
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील करडवाडी येथील श्रीकृष्ण गोमाता शाळेस हिंदु राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई यांनी भेट दिली.यावेळी गो माताची सेवा त्यांनी केली. शाळेत भाकड गोमाताची सेवा केली जात असून या ठिकाणी गोमाताचे चांगल्या प्रकारे पालन पोषण होत आहे.कसाईच्या तावडीतून वाचलेल्या सुमारे १५५ गाई असल्याने यांना गो शाळेत जीवनदान मिळाले आहे.गोमाता शाळेस अन्न,धान्य,चारा तसेच राहण्यासाठी निवा-यासाठी लागणारे साहित्य लवकरच पुरवणार असून गो माताची सेवा केल्यानंतर एक प्रकारे देवाची पुजा केल्याचे भाग्य मिळाले आहे. देशात अनेक प्रकारच्या गोमाता शाळा पाहील्या परंतु या ठिकाणी असलेली गोमाता शाळेत भाकड गायासाठी असलेल्या सुविधा चांगल्या आहेत.तसेच या गोमाता शाळेसाठी आणखी चांगल्या प्रकारची मदत केली जाईल.असे मत देसाई यांनी व्यक्त केले.
यावेळी गोमातेचे अध्यक्ष दिपक महाराज काळे यांनी
हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने देसाई यांचा सत्कार केला तसेच त्याच्या गोमातेच्या सेवेच्या कार्याबद्दल आंनद व्यक्त करत अभिनंदन केले.
तसेच गो मातेचा शुभ आशिर्वाद घेतला या वेळी गोमाता शाळेचे अध्यक्ष दिपक महाराज काळे यांचाही देसाई यांनी गोमाताच्या सेवेबद्दल सत्कार करुन सन्मान केला.यावेळी हिंदु राष्ट्र सेनेचे पदाधिकारी गोमाता सेवक कार्येकर्ते उपस्थित होते.