साठ वर्षावरील नागरिकांसाठी मोफत साहाय्यक साधने वाटप तपासणी शिबिराचे आयोजन
पाथर्डी- प्रतिनिधी
स्वतंत्र भारताच्या ७५ व्या वर्धापन दिन तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र अहमदनगर व जिल्हा समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डी येथे राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत ६० वर्षावरील नागरिकांसाठी मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन भाजपा तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर व अभय आव्हाड यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी जि. प. सदस्य राहुल राजळे ,नगराध्यक्ष डाॅ. मृत्युंजय गर्जे ,उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, गोकुळ दौंड, नगरसेवक रमेश गोरे, भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य अजय रक्ताटे ,ज्येष्ठ नेते दिनकराव पालवे, ,अजय भंडारी ,अॅड. प्रतीक खेडकर , विवेक देशमुख, राजेंद्र नांगरे, लालाभाई शेख, प्रतीक नांगरे आदी उपस्थित होते.
या मोफत सहाय्यक साधने वाटपामध्ये उंची कमी जास्त होणारी चालण्याची काठी ,उंची असलेली चालण्याची काठी, कोपर काठी ,ॲल्युमिनियम कुबड्या , चार पायाची काठी , तीन पायाची काठी ,घडीचे वाकर , नंबरचा चष्मा, श्रवण यंत्र ,फोल्डिंग चेअर ,कृत्रिम दात , कमोड चेअर , कमोड खुर्ची, पायाची काळजी संच , चालण्याची काठी सीट , संपूर्ण पाठीचा पट्टा, कमरेचा पट्टा , गुडघ्याचा पट्टा , आदी वस्तूंचे मोफत वाटप करण्यात येणार असून खासदार सुजय विखे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यास सर्व थरातून प्रतिसाद मिळत असून सर्व ६० वर्षावरील वयोवृद्ध नागरिकांनी पाथर्डी येथील मराठी शाळेत मोफत तपासणी करून घ्यावी व डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले.