दिव्यांग तरूणीवर अत्याचार करून पैसेही लुबाडले शेवगाव तालुक्यातील 'या' तरुणाला अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
याप्रकरणी गणेश रघुनाथ मडके (रा. सोनेसांगवी ता. शेवगाव) या तरूणाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 376, 2 (एन)(एल), 420, 504, 506, दिव्यांग अधि.का. 2016 चे कलम 92 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिव्यांग तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. 95 हजार रूपये घेतले. ही घटना ऑक्टोबर 2019 ते डिसेंबर 2020 दरम्यान वेळोवेळी घडली आहे.
नगर तालुक्यातील तरूणीने फिर्याद दिली आहे. नगर तालुक्यातील तरूणी खासगी नोकरी करते. तिची गणेश मडके सोबत ओळख झाली होती. गणेशला फिर्यादी या दिव्यांग असल्याची माहिती होती.
फिर्यादीला गणेशने लग्न करण्याचे अमिष दाखविले. त्याने ऑक्टोबर 2019 ते डिसेंबर 2020 या दरम्यान तिच्यावर अत्याचार केला.
तसेच गणेशने फिर्यादीकडून वेळोवेळी 95 हजार रूपये उसणे घेतले ते परत न करता फिर्यादीची फसवणूक केली. तुला काय करायचे ते कर, तु माझ्या विरोधात पोलीस केस केल्यास मी तुला जिवंत सोडणार नाही,
अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हंडाळ करीत आहेत.