हरिणाची शिकार करण्याचा तयारीत असणारा आरोपी जेरबंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील रेहेकुरी अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात हरिणाची शिकार करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा मोहरक्या ज्ञानेश्वर सुरेश काळे (रा. कुळधरण, ता. कर्जत) यास वनविभाग व पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने जेरबंद करण्यात आली. त्याच्याकडून जाळे, एक दुचाकी, कोयता व इतर साहित्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तालुक्यातील रेहेकुरी अभयारण्याच्या कार्य क्षेत्रांमधील गट नंबर १६१ ड या परिसरामध्ये काही शिकार्यांनी हरिण व काळवीट यांची शिकार करण्यासाठी जाळे (वाघर) लावली होती. त्यामध्ये हरिण व काळवीट घडतात, त्याची शिकार करण्यासाठी सर्वजण परिसरात लपून बसले होते. मात्र त्याच दरम्यान अभयारण्यातील कर्मचारी नियमित गस्त घालत असताना त्या परिसरात आल्यावर त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आला. मात्र या गस्त घालणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहून शिकार्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला व जंगलाचा फायदा घेऊन ते पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र या शिकाऱ्यांची एक दुचाकी, दोन नायलॉनचे मोठे जाळे व इतर मुद्देमाल घटनास्थळी मिळून आला. येथे असलेल्या दुचाकीवरून आरोपीचा शोध घेण्यात आला.