शिक्षणाच्या ध्येयाकडे यशस्वी वाटचाल करतांना घेतलेली भरारी कौतुकास्पद- अभय आव्हाड
पाथर्डी - प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थी कौटुंबिक अडचणीवर मात करून शिक्षणाच्या ध्येयाकडे यशस्वी वाटचाल करतांना घेतलेली भरारी कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले केले.
ज्ञानदेव कराड संचलित सहज अभ्यासिका केंद्रातील दिपक खोजे, विकास खोर्दे, वासुदेव जामदार, गणेश खेडकर, योगेश बेळगे या विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस व सी आर पी एफ मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी आव्हाड बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे पदी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील हे होते. या प्रसंगी शिक्षक नेते रामप्रसाद आव्हाड, विष्णू बांगर, संतोष पालवे ,अनिल कराड, अण्णा आंधळे, शशिकांत जायभाये , संस्कृती अर्बनचे अनंत सानप आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना आव्हाड म्हणाले, कोणत्याही यशाला शॉर्टकट नसतो. परिश्रम, सचोटी व सातत्यपूर्ण प्रयत्न, जिद्द,चिकाटी आणि महत्वकांक्षा ठेवल्यास यश निश्चित मिळते. मी ग्रामीण भागात राहतो, याचा न्यूनगंड न बाळगता अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी या विद्यार्थ्यांनी केलेली धडपड कौतुकास्पद आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदेव कराड यांनी केले सूत्रसंचालन आरीफ बेग यांनी तर आभार सविता कराड यांनी मानले.