छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम वर्षभरासाठी हद्दपार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अहमदनगरचा माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम या दोघांनाही अहमदनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलिसांनी काढले आहेत.
काही महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल तोफखाना पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. सध्या श्रीपाद छिंदम त्यांच्यावर संघटीतपणे टोळी तयार करणे, गैरकायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी त्या दोघांवरही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हद्दपारीचे आदेश -
श्रीपाद छिंदम आणि त्याच्या भावावर या आधी अनेक गुन्हे दाखल आहेत. जातीवाचक शिवीगाळप्रकरणीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांकडून त्यांच्यावर सतत सूचना आणि कारवाई करण्यात येते. त्यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्याच्या हद्दपारीचे आदेश काढले आहेत. या आदेशाबरोबरच छिंदम बंधूंविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी -
छिंदमची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. त्याच्यावर गुंडगिरी करणे, तरुणांचे टोळकं कायम बरोबर घेऊन फिरणे अशा प्रकारचे गुन्हे सतत होत असतात. मात्र ज्यावेळी छिंदमने महाराजांबद्दल अपशब्द काढले, तेव्हा लोकांनी छिंदम यांच्यासोबतच त्यांच्या साथीदारांच्या घरावरही दगडफेक केली होती.
राज्यात छिंदम विरोधात मोर्चे -
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षपार्ह वक्तव्य केल्याबद्दल राज्यभर छिंदम विरोधात मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली होती. या प्रकरणानंतर छिंदम याच्यासोबत त्यांच्या साथीदारांनाही नगर सोडावे लागले होते. छिंदम ज्या प्रभाग 9 मधून निवडणूक लढतो, तिथे 11 हजार 229 मते आहेत. त्यात पद्मशाली समाजाची 2500 मते असल्याचे सांगण्यात येत आहे.