पाथर्डी- श्री तिलोक जैन विद्यालयात स्टॅंडर्ड रायटिंग स्पर्धा उत्साहात
By Admin
पाथर्डी- श्री तिलोक जैन विद्यालयात स्टॅंडर्ड रायटिंग स्पर्धा उत्साहात
या उपक्रमासाठी भारत सरकारच्या अधिकृत प्रतिनिधी निशा कनबर्गींची उपस्थिती
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयात बी.आय. एस. क्लब अंतर्गत स्टॅण्डर्ड रायटींग स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
भारत की आजादी का अमृत महोत्सव (७५ वर्षे) निमित्त,केंद्र सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्या अंतर्गत भारतातील प्रत्येक राज्यात हा उपक्रम माध्यमिक शाळा,महाविद्यालय तसेच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये राबविला जात आहे. त्या अनुषंगाने तिलोक जैन विद्यालयात मोठ्या उत्साहात सदर उपक्रम आयोजीत करण्यात आला .या उपक्रमासाठी भारत सरकारचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून निशा कनबर्गी ( उपसंचालक) तसेच हर्ष मोहन शुक्ला (स्टॅण्डर्ड प्रमोशन ऑफीसर) पुणे शाखा हे उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये मध्ये एकूण ५० विद्यार्थी सहभागी झाले. प्रत्येकी ५ विद्यार्थ्यांचे दहा ग्रुप करण्यात आले. त्यांना हर्ष मोहन शुक्ला व निशा कनबर्गी यांनी स्टॅण्डर्ड बाबतीत सविस्तर माहीती देवून त्याच्या लेखन पायऱ्या सविस्तर विशद केल्या. त्या नंतर मुलांना " स्किम्ड मिल्क पावडर " या उत्पादनावर स्टॅण्डर्ड बनवून त्याचे सादरीकरण करायला लावले. मुलांनी अतिशय सुंदर पद्धतीने केलेले स्टॅण्डर्ड रायटींग व सादरीकरण पाहून उपसंचालक व त्यांच्या समवेत असलेले भारत सरकारचे अधिकारी अक्षरशः प्रभावीत झाले. विशेष म्हणजे मुलांनी फक्त एका दिवसात स्टॅण्डर्ड गॅलरी तयार केली. बी. आय .एस. सिम्बॉल रांगोळी रेखाटन केले, त्याचे ही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. सदर गॅलरी पाहून तर ते खूपच प्रभावीत झाले.
त्यांनी मुलांच्या या उपक्रमाबाबत खूप कौतुक केले. तसेच या वेळी मेटाँर प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण केल्याबद्दल मेंटाँर सुनिल कटारिया यांना देखील मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
या वेळी आयोजीत कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य अशोक दौंड यांनी केले. या प्रसंगी त्यांनी संस्थेची सविस्तर माहीती दिली. संस्थेची शताब्दी कडे वाटचाल होत असतांना प्रगतीचा आलेख कसा उंचावत गेला, हे देखील सविस्तरपणे विशद केले. शालेय परीसर, उपक्रम इ. बाबत माहीती दिली. संस्थेची प्रगती पाहून अधिकाऱ्यांनी देखील संस्थेचे विशेष कौतुक केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य अशोक दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली मेंटाँर सुनिल कटारिया व को - मेंटाँर संध्या पालवे यांनी केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड , उपप्राचार्य विजयकुमार छाजेड , पर्यवेक्षक दिलावर फकीर, विजयकुमार घोडके, सुधाकर सातपुते , बी . आय . एस . चे मेंटॉर सुनिल कटारिया, को - मेंटॉर संध्या पालवे , विद्यालयातील नववी ते बारावीचे क्लब चे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल कटारिया यांनी केले तर आभार संध्या पालवे यांनी मानले .

