महाराष्ट्र
एकनाथवाडी विकास सोसायटीवर श्रीकृष्ण शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व
By Admin
एकनाथवाडी विकास सोसायटीवर श्रीकृष्ण शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी वि.का.स. सेवा सोसायटीच्या निवडणुकीत भाजपचे तालुका चिटणीस बाबा सानप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती भगवान गायकवाड व मनसे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांच्या नेतृत्वाखाली श्रीकृष्ण शेतकरी विकास पॅनलने ११ पैकी ११ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला.
पाथर्डी तालुक्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या एकनाथवाडी सोसायटीची सन २०२२ ते २०२७ करिता पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सदर निवडणुकीत श्रीकृष्ण शेतकरी विकास पॅनलने ११ पैकी ११ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले.
श्रीकृष्ण शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व भाजपचे तालुका चिटणीस बाबा सानप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती भगवान गायकवाड व मनसे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी केले होते.
श्रीकृष्ण शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे: सर्वसाधारण खातेदार कर्जदार मतदार संघ- महादेव कोंडीबा खेडकर, शहादेव नामदेव खेडकर, लक्ष्मण पांडुरंग गायकवाड, शहादेव किसन घुले, पांडुरंग रामभाऊ चेमटे, द्वारकाबाई विनायक डोंगरे, महादेव ज्ञानदेव तांदळे, गहीनाथ कारभारी मिसाळ. महिला राखीव- शोभा राजाराम खेडकर, सुशीला केशव खेडकर. विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग- अजिनाथ विक्रम खेडकर हे उमेदवार विरोधी उमेदवारांच्या मतांच्या अधिक फरकाने विजयी झाले.
या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक उपनिबंधक डी.डी. पारधे यांनी काम पाहिले तर सचिव महादेव खेडकर यांनी त्यांना सहाय्य केले. निकालानंतर विजयी उमेदवारांची मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी विजयी उमेदवारांचे पंचारती ओवाळून स्वागत करण्यात आले. मिरवणुकीचा समारोप विजयी सभेने करण्यात आला.
यावेळी श्री कृष्ण शेतकरी विकास पॅनलचे दत्ताहरी खेडकर, लक्ष्मण आंगरख, विजय खेडकर, विनोद खेडकर, डॉ. महादेव खेडकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags :
2666
10