राज्यस्तरीय उत्कृष्ठ संत साहित्य पुरस्कारासाठी संत साहित्य पाठवा- डॉ. आर.जे.टेमकर
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील आदिनाथ नगर येथील श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे दादा पाटील राजळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आदिनाथ नगर यांचे वतीने दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे संस्थापक सहकार महर्षी स्व. दादापाटील राजळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सहकार महर्षी स्व. दादापाटील राजळे राज्यस्तरीय उत्कृष्ठ संत साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहे.
सदर पुरस्कार १ जानेवारी २०२० ते ३० जून २०२२ या कालावधीत प्रकाशित झालेल्या संत साहित्य निर्मितीसाठी दिला जाणार आहे. पुरस्काराचे स्वरूप, रोख रक्कम ११०००/- रुपये, प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते २२ऑगस्ट २०२२ रोजी होणाऱ्या जन्मशताब्दी कार्यक्रमांमध्ये प्रदान करण्यात येईल. तरी संबंधित साहित्यिकांनी आपले साहित्य कृतीच्या दोन प्रती ३० जुलै २०२२ पर्यंत प्राचार्य, दादा पाटील राजळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आदिनाथनगर, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर, पिन- ४१४५०५. दूरध्वनी- ०२४२८ २४५०१४, मो.नं. ९४२२२८१०४१ या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन दादापाटील राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे.टेमकर यांनी केले आहे.