महाराष्ट्र
चांदीच्या वस्तूंची 'या' ठिकाणी चोरी शहरातील चोरीचे गुन्हेगारी वृत्त
By Admin
चांदीच्या वस्तूंची 'या' ठिकाणी चोरी शहरातील चोरीचे गुन्हेगारी वृत्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सचिन रमेशलाल चोपडा (वय 47, रा. ख्रिस्तगल्ली, अहमदनगर) यांचे चोपडा क्लॉथ कॉर्नर भागात दुकान आहे. या दुकानातील चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 32 हजार रुपयांच्या वस्तू चोरला गेल्या. सचिन चोपडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस नाईक पठारे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
अहमदनगर शहरातील कापड बाजारातील सारडा गल्लीतील चोपडा क्लॉथ कॉर्नरजवळील दुकानातून 32 हजार रुपये किंमतीचे चांदीचे नारळ आणि रोख रक्कम चोरीला गेली. शुक्रवारी (ता.11) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली.
तपोवन रस्त्यावर घरफोडी
अहमदनगर : शहरातील सावेडीतील तपोवन रस्त्यावरील छत्रपतीनगरमध्ये घर फोडण्यात आले. चोरट्यांनी पाच हजार 900 रुपयांचा ऐवज चोरला. सुप्रिया अभय बोरा (वय 29) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, छत्रपतीनगरमधील घर हे शुक्रवारी (ता. 11) दुपारी दोन ते शनिवारी (ता. 12) सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या दरम्यान घर फोडले. चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा पाच हजार 900 रुपयांचा ऐवज चोरला. बोरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हवालदार गिरी हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
शेती अवजारांची चोरी
अहमदनगर : शेतातील लोखंडी अवजारांची चोरी झाली. कृषी उत्पन्न बाजार समिती ते वाकोडी रस्त्यावरील भवानीनगरमधील शेतात ही चोरी झाली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमन प्रभाकर त्र्यंबके (वय 65) यांची भवानीनगरमध्ये शेती आहे. त्यांनी शेतात चार हजार रुपये किंमतीचे अवजारे शेतात ठेवले होते. चोरट्यांनी गुरूवारी (ता. 10) दुपारी तीन ते शुक्रवारी (ता. 11) सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. कोतवाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ढगे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
दुचाकीची चोरी
अहमदनगर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) आवारातून दुचाकी चोरीला गेली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल अर्जुन कांडेकर (वय 41, रा. हमीदपूर, ता. नगर) यांनी ता. 13 मार्च रोजी आय. टी. आय.च्या आवारात सकाळी 11 वाजता हिरो होंडा (एमएच 16 एपी 3014) ही दुचाकी लावली होती. चोरट्यांनी ही पाच हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरली. कोतवाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार सोनवणे पुढील तपास करीत आहेत.
मोबाईल टॉवरच्या साहित्याची चोरी
अहमदनगर : मोबाईल टॉवरच्या साहित्याची चोरी झाली. घोसपुरी (ता. नगर) गावातील कवडे यांच्या शेतातील मोबाईल टॉवरची ही चोरी झाली. बी. एस. एन. एल. कंपनीचा घोसपुरी गावात मोबाईल टॉवर आहे. चोरट्यांनी शनिवारी (ता. 12) पहाटे तीन ते सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान 18 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरले. तांत्रिक अधिकारी अनिल रावसाहेब दाते (वय 42, रा. हिंगणगाव, ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार गव्हाणे हे पुढील तपास करीत आहेत.
Tags :
77730
10