पाथर्डी- सफरचंदचा ट्रक उलटला, मदत करायचे सोडून सफरचंद लुटण्यासाठी धावाधाव
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील करंजीजवळ झालेल्या अपघातानंतर रस्त्यावर सफरचंदाचा सडा पडला होता.
प्रवाशांनी यावेळी सफरचंद लुटण्यसाठी एकच धावाधाव केली. समजलेली अधिक माहिती अशी : मुंबई वाशी मार्केट याठिकाणावरून नऊ टन सफरचंद भरलेला ट्रक नगरमार्गे नांदेडकडे चालला होता.
आज अर्थात गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास करंजी गावाजवळ रस्त्यावर पडलेले खड्डे चुकवताना या ट्रकला अपघात झाला व हा ट्रक रस्त्यावरच उलटला. अपघातानंतर ट्रकमधील सफरचंद अक्षरशः रस्त्यावर पडले.
पाथर्डी तालुक्यातील करंजी गावाजवळ (पाथर्डी तालुका) सफरचंद घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. यात जवळपास नऊ टन सफरचंद होते.
सदर ट्रक मुंबईहून नांदेडकडे निघाली होती.
आज अर्थात गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास करंजी गावाजवळ रस्त्यावर पडलेले खड्डे चुकवताना या ट्रकला अपघात झाला व हा ट्रक रस्त्यावरच उलटला. अपघातानंतर ट्रकमधील सफरचंद अक्षरशः रस्त्यावर पडले.
रस्त्यावर सफरचंद पडल्याचे माहिती करंजीसह परिसरातील ग्रामस्थांना समजतात अनेकांनी सफरचंद आणण्यासाठी या अपघातग्रस्त ट्रककडे धाव घेतली. सदर घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलिस व करंजी आऊट पोस्टचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला हाटवला. सफरचंदाच्या हव्यासापोटी जमलेल्या प्रवाशांना लाठीचा प्रसादही दिला.
त्यानंतर गर्दी कमी झाली. दरम्यान अनेक प्रक्रियेनंतर सदर सफरचंद इतर वाहनातून नांदेडकडे पाठवण्यात आले.