शेतकऱ्याचे चोरट्यांनी तब्बल 5 हजार किलो कांदे नेले चोरून
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
आता चोरटयांनी शहरातील मोठं मोठी घरांसोबतच आता शेतकरीही लक्ष्य बनवायला सुरवात केली आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील वाकडी येथील रहिवाशी सोपान विठ्ठल मोमले यांच्या शेतातून जवळपास साडेचार ते पाच हजार किलो कांडा चोरटयांनी चोरून नेला आहे.
त्यामुळे आता शेतकऱ्यावर हतबल होण्याची वेळ आलि आहे. प्रगतशिल शेतकरी सोपान विठ्ठल मोमले यांची वाकडी-राजुरी रस्त्यालगत शेतजमीन आहे.
या क्षेत्रात सुमारे पावणेदोन एकर कांदा पिक घेतले होते. सदर कांदा काढणीचे काम दोन दिवसांपासून सुरु होते. शुक्रवारी सदर कांदा काढून शेतातच पोळ घातला होता.
दरम्यान ते 8 एप्रिल रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास शेतातून काम आटोपून घरी परतले. 9 एप्रिल रोजी सकाळीते शेताता गेले असता कांद्याची एक पोळच चोरट्यांनी उचलून नेलायचे त्यांना आढळले.
शेतात पाण्याची बाटली व एक मफरल आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या बाजारभावानुसार हा 45 ते 50 हजाराचा माल असून हजारोंचे नुकसान त्यांचे झाले आहे.
सदर कांदा चोरी प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविणार असल्याचे मोमले यांनी सांगितले