महाराष्ट्र
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान
By Admin
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान
महाविकास आघाडीच्या बजेटामध्ये पंचसूत्री,
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
करोना संकटाशी तोंड देताना कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास , दळणवळण आणि उद्योग या विकासाच्या पंचसुत्रावर आधारित अर्थसंकल्प आज ठाकरे सरकारने विधानसभेत 24 हजार 353 कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर केला.
यासाठी येत्या तीन वर्षांकरिता चार लाख कोटींची तरतूद करण्यात आली. यातून राज्यात भरीव गुंतवणूक होऊन राज्याचा जीडीपी एक लाख कोटी डाॅलर्सपर्यंत वाढेल, असे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पाच राज्यांच्या निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आज 2022-23 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहे. अर्थमंत्री अजित पवार व अर्थराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी अर्थसंकल्प सादर केले. महाविकास आघाडी सरकार सभागृहात सादर करत असलेला हा दुसरा अर्थसंकल्प आहे.
कृषी क्षेत्रात मोठी तरतूद
आजच्या बजेटमध्ये शेती क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची प्रोत्साहनपर मदत घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली. याचा २० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. भूविकास बँकेच्या ३४७८८ शेतकऱ्यांची ९६४ कोटीची कर्जमाफी करण्याची घोषणा आज पवार यांनी केली. त्यामुळे या बँकेच्या शेतकऱ्यांना आज अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांची २७५ कोटींची थकीत देणी अदा केली आहेत. तसेच भूविकास बँकांच्या जमिनींचा, इमारतींचा वापर यापुढे शासकीय योजनांसाठी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी मोठी घोषणा
करोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी पंडिता रमाबाई महिला उद्योजक योजनेची घोषणा, या महिलांना स्वयंरोजगरासाठी भांडवल उपलब्ध करून देणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे.
Tags :
32684
10