भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना पुर्ण वेळ विज द्यावी.- बाळासाहेब ढाकणे
पाथर्डी- प्रतिनिधी
गेली दोन वर्षापासुन पाऊस चांगला झाल्यामुळे बागायत क्षेत्र वाढले आहे. शेतामध्ये सध्या पिके चांगली आली आहेत शेतीला देण्यासाठी पाणी देखील आहे परंतु महाराष्ट्र शासनाने भारनियमन लागू केल्यामुळे केवळ शेतीला पुर्णवेळ पुर्ण क्षमतेने विद्यूत पुरवठा होत नसल्यामुळे शेतातील उभे पिकांना कडक उन्हाळ्यामुळे पाणी देण्याचे गरजेचे आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या भारनियमनामुळे नियमीत विद्यूत पुरवठा होत नसल्यामुळे शेतातील उभे पिके जळु लागले आहेत व शेतकऱ्यांचे भारनियमनामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. तरी महाराष्ट्र शासनाने भारनियमन बंद करुन पुर्ण क्षमतेने पुर्ण वेळ शेतकऱ्यांना शेतीसाठी विद्युत द्यावी अशी मागणी राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा किसान मोर्चाचे दक्षिणचे सरचिटणीस शेतकरी नेते ढाकणे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.
शेतकऱ्यांना शासनाने विजबिल भरण्यासाठी सक्तीची वसुली केली त्याचप्रमाणे भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना पुर्ण क्षमतेने व पुर्ण वेळ विद्यूत देणे ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे. कोळसा संपला आहे असे कारण पुढे करुन भारनियमन लावणे चुकीचे आहे. त्यासाठी सरकारने वेळीच नियोजन केले पाहीजे व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळले पाहीजे.
तरी महाराष्ट्र शासनाने वेळीच कोळसा आयात करुन भारनियमन बंद करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यतः भारनियमनाला कंटाळून शेतकऱ्यांचा मोठा उद्रेक होण्याच्या अगोदर महाराष्ट्र शासनाने तातडीने भारनियमन बंद करण्यासाठी उपयोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी नेते ढाकणे यांनी उर्जामंत्री राऊत यांच्याकडे ईमेल द्वारे पञ पाठवून केली आहे.