पाथर्डी तालुक्यातील 'या' गावात दोन चोरट्यांशी वृद्धाची झटापट, डोक्यात दगड मारून जबर जखमी केले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथे चोरट्यांच्या झटापटीत राधाकिसन मिसाळ हे वृद्ध गंभीर जखमी झाले. काल रात्री हा प्रकार घडला. जखमीला उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे.
मिसाळ कुटुंबीय घराबाहेर ओट्यावर झोपलेले असतांना दोन चोरट्यांनी राणी आदिनाथ मिसाळ, उषा मिसाळ यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरुन घेऊन जाताना झालेल्या झटापटीत राधाकिसन विष्णू मिसाळ (वय 67) यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड मारून जबर जखमी केले.
ही घटना गुरुवारी ( दि 9 ) रोजी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमार घडली. याघटनेत चाळीस हजारांचा सोन्याचा ऐवज चोरटयांनी लंपास केला आहे. मिसाळ कुटूंबिय बुधवारी ( दि 8) रात्री घराच्या ओट्यावर बाहेर झोपले. गुरुवारी रात्री 1 . 30 वाजता उषा राधाकिसन मिसाळ यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडत असल्याचे दोघे चोरटे राणी मिसाळ यांना पाहिले.
चोरटयांनी उषा हिच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढत होते. झटापटीत चोरटयांनी उषा हिच्या गळ्यातील सात ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्रापैकी पाच ग्रॅम तोडुन घेवुन पळून गेले. राणी मिसाळ यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरटयांनी लांबवले. राधाकिसन यांच्या डोक्यात दगड घालून चोरटयांनी त्यांना जखमी केले. नंतर आरडाओरडा ऐकून शेजारी राहणारे पांडुरंग गहाळ, श्रीकांत मिसाळ यांनी शेवगाव येथे उपचारासाठी दाखल केले. राणी मिसाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.