जनकल्याण रक्तपेढीच्यावतीने अष्टवाडा तरुण मंडळास गौरव पुरस्कार
पाथर्डी- प्रतिनिधी
अहमदनगर येथील जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने १ मे २०२२ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्ताने जनकल्याण गौरव पुरस्कार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या जनकल्याण गौरव पुरस्कारासाठी पाथर्डीतील सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असणारे अष्टवाडा तरुण मंडळाची निवड जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर यांनी केली आहे.सर्वात जास्त रक्तदान शिबीर व रक्तसंकलन केल्या बद्दल हा पुरस्कार 3 वर्षातून एकदा दिला जातो.
अष्टवाडा तरुण मंडळ सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असते.मागील दोन ते तीन वर्षांपासून त्यांनी अनेक रक्तदान शिबिर आयोजित केली आहेत व या शिबिरामध्ये नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवला आहे. तसेच कोरोना काळात लसीकरण शिबीर,कोविड मध्ये अँटीजन चाचणी शिबीर,कोरोनाच्या भयंकर स्थिती मध्ये अष्टवाड्यातील अनेक नागरिकांना कोविड सेंटर मध्ये बेड ची व्यवस्था मंडळाने करून दिली होती.महिला कोविडयोद्धा चा सन्मान,गणेशोत्सवमध्ये महिलांसाठी मनोरंजन कार्यक्रम व देखाव्या मधून लसीकरणा विषयी नागरिकांच्या मनामध्ये असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे अशी जनजागृती करणारा देखावा उभारला होता.असे अनेक सामाजिक कार्य लोकसहभागातून अष्टवाडा तरुण मंडळ करत असते. या सर्व कार्याची दखल घेऊन जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर यांनी अष्टवाडा तरुण मंडळाला गौरवचिन्ह देऊन सन्मानित केले आहे.
जनकल्याण गौरव पुरस्कार हा मी मंडळाच्या सर्व सदस्यांना व अष्टवाडयातील सर्व नागरिकांना समर्पित करतो. आगामी काळात असेच सामाजिक उपक्रमे राबण्याचा आमचा मानस आहे. ह्या पुरस्काराने नक्कीच प्रेरणा मिळेल.
- आतिष निऱ्हाळी
अध्यक्ष-अष्टवाडा तरुण मंडळ