रस्त्यावर प्रवास करताना शिक्षिकेस लुटले;बॕगमधील6 तोळे दागिने लंपास
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
या शिक्षक महिलेचे 1 लाख 70 हजार रुपयांचे सुमारे 6 तोळे वजनाचे दागिने चोरट्याने चोरून नेले आहेत. मिरजगाव, ता. कर्जत येथील या महिला शिक्षिका आहेत. दि. 10 मे रोजी दुपारी त्या व त्यांची मुलगी अहमदनगर येथील तारकपूर बसस्थानकातून बसमध्ये बसल्या होत्या. त्यांच्याजवळ असलेल्या कपड्यांच्या बॅगमध्ये त्यांनी सोन्याचे दागिने ठेवले होते.
सव्वादोन वाजे दरम्यान ती बस राहुरी बसस्थानकात आली. या प्रवासा दरम्यान त्यांच्या बॅगेतील सहा तोळे सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात भामट्याने चोरून नेले. राहुरीत आल्यावर त्यांना ही गोष्ट समजली. पोलीस अधिक तपास करत आहेत.
अलीकडील काळात अशा घटना जास्त घडताना दिसतात. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू बाळगू नये, जर असतील तर त्याची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी असे आवाहन अनेकदा पोलीस प्रशासन, एसटी प्रशासन करत असते.
चोऱ्यांसारख्या घटना अलीकडील काही दिवसांत वाढलेल्या दिसतात. आता नुकत्याच एका आलेल्या वृत्तानुसार नगर-राहुरी प्रवासा दरम्यान बसमध्येच एका शिक्षिकेस चोरटयांनी लुटले आहे.