भैरवनाथ मंदिर परिसरात संशयितरित्या फिरणार्या पाथर्डी तालुक्यातील 5 जणांना बेड्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
आगडगाव(नगर) भैरवनाथ मंदिर परिसरात संशयितरित्या फिरणार्या पाथर्डी तालुक्यातील 5 जणांना बेड्या
सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली.
दि. 26 रोजी पहाटे तीनच्या सुमारास आरोपी हे त्यांच्या तोंडाला रूमाल व उपरणे बांधून त्यांची ओळख लपवून त्यांच्या ताब्यातील वाहनासह (क्रमांक एमएच 12 जी.व्ही.5702) काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या आढळून आले. याप्रकरणी सहायक फौजदार भास्कर लबडे यांनी फिर्याद दिली आहे. बाळकृष्ण नामदेव खताळ (वय 26, रा. आडगाव, ता. पाथर्डी), प्रदीप बाबासाहेब खेमनर (वय 23, रा. माका), किशोर उत्तम कुसळकर (वय 26, रा. माका), दत्तात्रय भागवत म्हस्के (वय 25, रा. रेणुकाईवाडी, ता. पाथर्डी), दीपक मोहन तोगे (वय 31, रा. मिरी, ता. पाथर्डी) यांच्या विरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आगडगाव (ता.नगर) येथील भैरवनाथ मंदिर परिसरात पहाटे तीनच्या सुमारास संशयितरित्या फिरणार्या पाच जणांना नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.