महाराष्ट्र
पाथर्डी-नगर रस्त्यावर डोक्यात रॉड मारून एकास लुटले
By Admin
पाथर्डी-नगर रस्त्यावर डोक्यात रॉड मारून एकास लुटले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
डोक्यात लोखंडी रॉड मारून चोरट्यांनी एकास लुटण्याची घटना पाथर्डी येथील गायछाप कारखाना परिसरात सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी 24 तासांच्या आत दोन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.
या दोघांनी पाथर्डी शहर व तालुक्यात तीन ठिकाणी लोकांना रस्त्यात अडवून मारहाण करून बळजबरीने ऐवज लांबविल्या आहेत.
एक संशयित आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दुसरा आरोपी अजय पिराजी पवार (वय 19, रा.शिक्षक कॉलनी, पाथर्डी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जयराम भानुदास ढाकणे हे रात्री दहा वाजता दुचाकीवरून शिक्षक कॉलनीतून गायछाप कारखान्याकडे जात होते. बाबुजी आव्हाड कॉलेज गेटजवळ दोन अनोळखीनीअडवून कॉलेजच्या गेटच्या आत नेले. लोखंडी रॉड व कुर्हाडीचा धाक दाखवून त्यांच्या खिश्यातील पैसे काढून घेतले. ढाकणे यांनी प्रतिकार केला, त्यातील एकाने रॉड डोक्यात मारून जखमी केले. यानंतर आरोपी तेथून पळून गेले.
किरण मरकड (रा. निवडुंगे, ता. पाथर्डी) यांनाही अडवून मोबाईल, 700 रुपये व एटीएम कार्ड बळजबरीने काढून घेतल्याची घटना घडली. पाथर्डी-माणिकदौंडी रस्त्यावर पोलिस वसाहती लगतच्या पाण्याच्या टाकीजवळ याच आरोपींनी सतीश धर्मे यांना मारहाण करून यांच्या खिशातील पाचशे रुपये व मोबाईल कोढून घेतलेे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेतला; हाती लागले नाहीत. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता या आरोपींचा पोलिसांना सुगावा लागला. त्यानंतर सुमारे तीन तास या आरोपींचा पाठलाग करून एका आरोपीला माळी बाभुळगाव शिवारात, तर दुसर्या आरोपीला पाथर्डी- शेवगाव रस्त्यावरील संत सावतामाळीनगर येथूून पकडण्यात आले.
आरोपी पळण्यात पटाईत
गुन्ह्यातील एक आरोपी अल्पवयीन असून, तो पळण्यात चतुर आहे. या आरोपींची ओळख पटल्यानंतर तरूण पोलिसांनी त्यांना जाळे करून पकडले. बाबूजी आव्हाड कॉलेजच्या मैदानावरून एक आरोपी माळी बाभुळगावच्या दिशेने पळाला. तर, दुसरा शेवगाव ररस्त्याच्या दिशेने पळाला होता. पोलिसांनी आरोपींच्या वेगानेच तेवढ्याच वेगाने पळून अखेर या दोघांना ताब्यात घेतले.
Tags :
30175
10