लोकशाही मजबूत करण्याचे काम मतदार करतात- प्राचार्य शेषराव पवार
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी येथील श्री आनंद महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार जागृती अभियान अंतर्गत मतदानकार्डाशी आधार कार्ड लिंक करण्याचे अभियान नुकतेच राबविण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. निवडणूक नायब तहसीलदार संजय माळी हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना तसेच निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन मतदार नोंदणी तसेच वोटर हेल्पलाइन ॲप्लिकेशन च्या साहाय्याने आधार लिंक करण्याचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना म्हणाले, आपल्या देशातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असुन, लोकशाही मजबूत करण्याचे काम मतदार करतात, त्यासाठी महाविद्यालयातील युवकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
निवडणूक नायब तहसिलदार संजय माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, मतदानकार्डाशी आधार नोंदणी करून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रा. अनिता पावसे, प्रा. डॉ. जयश्री खेडकर, प्रा. रुपाली शिंदे, निवडणूक विभागाचे कर्मचारी आकाश माने सह विध्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बुथवेल पगारे यांनी केले तर प्रा. डॉ. इस्माईल शेख यांनी आभार मानले.