शेवगाव तालुक्यातील 'या' गावांचा बोधेगाव प्रादेशिक पाणी योजनेत समावेश करण्याची मागणी
By Admin
शेवगाव तालुक्यातील 'या' गावांचा बोधेगाव प्रादेशिक पाणी योजनेत समावेश करण्याची मागणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पिण्याच्या पाण्यापासून वंचित असलेल्या मौजे बेलगाव,सोनेसांगवी,वरखेड,अंतरवाली बुद्रुक,मुर्शदपुर व लखमापुरी (तालुका शेवगाव) या गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी बोधेगाव प्रादेशिक पाणी योजनेत त्यांचा समावेश करण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता मुळे यांना दिले.
काकडे यांनी या गावातील महिलांसह सदर प्रश्नावर मुख्य कार्यकारी अधिकारी व जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन चर्चा केली.यावेळी महिलांना पाणी प्रश्नावर आक्रोश व्यक्त केला.याप्रसंगी जिजाबाई जाधव, लताबाई लोहकरे, पार्वती पोकळे, उर्मिला जाधव, अनिता जाधव, लंकाबाई भारस्कर,सकुबाई जाधव, रुख्मिनी काकडे, मिरा तेलोरे, विमल काळे, शिलाताई गोरे, मंगल पातकळ, मंगल तेलोरे,भिमाबाई पठाडे,शिला तेलोरे, भगवान शेळके, मोहन गवळी, महादेव पातकळ, दिपक शिंदे, अशोक दातीर आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.शेवगाव तालुक्यातील मौजे बेलगाव, सोनेसांगवी, वरखेड, अंतरवाली बुद्रुक, मुर्शदपुर व लखमापुरी या गावांचा हातगावसह २८ गावांची पाणी योजनेमध्ये समावेश होता. त्यानुसार वरील गावात काही ठिकाणी टाक्या वगैरे बांधून खूप दिवस झाले आहे.परंतु वरील गावांना पाणी मिळालेले नसून, या गावातील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे.या गावात कुठेही पाण्याचा स्त्रोत नसल्याने शाश्वत पाणी मिळण्यासाठी बोधेगाव प्रादेशिक पाणी योजनेशिवाय पर्याय स्पष्ट करण्यात आले आहे.या चारही गावाच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ठराव करून या गावांना हातगावसह २८ गावांची पाणी योजनेमध्ये राहायचे नसल्याचा निर्णय घेतला आहे. सदरील गावे या योजनेतून
बाहेर पडलेली आहेत. गावाती ल नागरिकांना पिण्यासाठी पाणी नसून, पाण्यासाठी महिलांसह लहान मुलांना वणवण हिंडावे लागत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या गावांचा बोधेगाव प्रादेशिक पाणी योजनेत समावेश केल्यास त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. बोधेगाव पाणी योजना ज्या ठिकाणावरून जाते, त्या रस्त्यालगतच ही गावे आहेत. त्यामुळे मौजे बेलगाव, सोनेसांगवी, वरखेड, अंतरवाली बुद्रुक, मुर्शदपुर व लखमापुरी (ता. शेवगाव) या गावांचा पाणी प्रश्न सोडवि ण्यासाठी बोधेगाव प्रादेशिक पाणी योजनेत समावेश करण्याची मागणी काकडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.