पाथर्डी तालुक्यातील 'या' गावातील JCBचालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
रस्त्यावर गाडी अडवून चौघांनी बळजबरीने विषाची बाटली काढून नगर येथील जेसीबी मालकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (ता. ६) सकाळी साडेदहाच्या सुमारास खेडी गोवर्धन रस्त्यावर घडली.
योगेंद्र शिवाजी उदागे (रा. सुसरे, ता. पाथर्डी, जि अहमदनगर) हल्ली मुक्काम मांडळ हे खेडी गोवर्धन रस्त्यावरून जात असताना खेडी गावापासून दीड किलमीटर अंतरावर मांडळ येथील सुरेश धनगर, दीपक धनगर, दगडू धनगर व फागणे येथील किशोर धनगर हे चौघे दोन मोटरसायकलवर मागाहून येऊन योगेंद्रची गाडी अडवली आणि चौघांनी मारहाण केली तर सुरेश याने खिशातून विषाची बाटली काढली आणि दीपक व दगडू यांनी हात धरून ठेवले सुरेश याने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.