महाराष्ट्र
न्यायालयाच्या आवारात जावयाकडून सासू आणि पत्नीवर गोळीबार
By Admin
न्यायालयाच्या आवारात जावयाकडून सासू आणि पत्नीवर गोळीबार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शिरुर न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर घरगुती भांडणाच्या कारणावरुन पतीने पत्नी व सासूवर गोळीबार केला. त्यात पत्नी मंजुळा दिपक ढवळे (वय ३६) ठार झाली तर सासू तुलसाबाई रंगनाथ झांबरे (वय ५६ दोन्ही रा वाडेगव्हाण , ता.
पारनेर जि अहमदनगर) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
अनपेक्षित घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने भीतीचे वातावरण झाले होते. गोळीबार केलेल्या व्यक्तीला न्हावरा फाटा येथे पोलीसांनी पाठलाग करुन पकडले .या प्रकरणी आरोपी दीपक पांडुरंग ढवळे व संदीप पांडुरंग ढवळे( मुळ रा . ढवळगाव सध्या रां अंबरनाथ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे . हल्लेखोर हे रिक्षातुन आले होते .
शिरूर न्यायालयाच्या परिसरात नवऱ्याने बायको व सासुला पिस्तुल मधुन गोळया झाडल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवार) घडली आहे. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून, सासू गंभीर जखमी झाली आहे.
या घटनेत मंजुळा दिपक पाडुरंग ढवळे ( वय ३६ ) मुळ रा . वाडेगव्हाण ( अहमदनगर ) या गोळी लागुन जागीच मृत्यु झाल्या आहेत . तर सासु तुळसाबाई रंगनाथ झावरे ( वय ५५ ) या जखमी झाल्या असुन खाजगी रुग्नालयान उपचार सुरु आहे . याबाबत माहीती अशी की दिपक ढवळे यांचा विवाह मंजुळा झावरे हिच्याशी झाला होता . त्याच्यात सतत वाद होत होते .पटत नसल्यांने कोर्टात पोटगीची केस मंजुळा ढवळे यांनी दाखल केली होती . या केसचा निकाल आज लागणार होता . त्यामुळे दोन्ही कुंटुबातील सदस्य उपस्थित होते . त्यामुळे ढवळे व झावरे कुंटुबात वाद होत शब्दीक चकमक झाली . दिपक हा मिलिटरी मधुन निवृत्त झालेला असुन त्यांने कमरेला पिस्तुल घेऊन भावासह आला होता .न्यायालयात केसच्या सुनावनीसाठी आलेला दीपक ढवळे (रा, सध्या रा. अंबरनाथ (ठाणे), याने त्याचा भावाच्या मदतीने बायको व सासूवर पिस्तुलातून
गोळ्या झाडल्या. गोळी झाडीत पळुन जाण्यांचा प्रयत्न केला .या गोळीबारात पत्नीचा मृत्यू झाला आहे. या सिनेस्टाईल प्रकरणा मुळे परीसर हादरून गेला .सासूवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ माजली आहे .
रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलिस उपनिरीक्षक देविदास कंरडे, शुभांगी कुटे, पो. अंमलदार ब्रम्हा पवार, संतोष औटी, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नजिम पठाण, पोलिस अंमलदार राजेंद्र गोपाळे, प्रविण पिठले, संतोष सांळुंके यांनी दोनही आरोपींना पाठलाग करून तात्काळ ताब्यात घेतले आहे . पोलिस पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत करत आहेत.
Tags :
711
10