साकेगाव सोसायटी चेअरमनपदी विष्णूपंत अकोलकर,व्हा.चेअरमनपदी विक्रम डांगे
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील साकेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी विष्णूपंत अकोलकर व व्हा. चेअरमनपदी विक्रम डांगे याची बिनविरोध निवड झाली आहे. प्राधिकृत अधिकारी वाय,एल.नरसिंगपूर यांच्या अध्यक्षतेखाली (दि.25) रोजी झालेल्या मिटींगमध्ये पाच वर्ष कालावधीसाठी
संचालक मंडळ निवड करण्यात आली आहे.अकोलकर यांनी पंचायत समिती उपसभापतीपद भुषवले आहे.
येत्या पाच वर्ष कालावधीत वि.का.से.सो. सभासदाचे हिताचे निर्णय घेण्यात येतील.असे चेअरमन विष्णूपंत अकोलकर यांनी सांगितले.
यावेळी संचालकपदी निवड झालेले
जगन्नाथ मुरलीधर डांगे, राजेंद्र निवृत्ती दहातोंडे, विष्णू सिताराम सातपुते, चंद्रकांत नामदेव सातपुते, राजेंद्र योसेफ बळीद, आसाराम भानुदास सातपुते, सिकंदर बन्सी शेख, विष्णू भानूदास सातपुते, सौ. ताराबाई भागुजी सातपुते, सौ.शिवगंगा दत्तात्रय वाघ, सोसायटी सचिव विष्णू भाऊराव कराळे
सर्व संचालक मंडळ व साकेगाव, काळेगाव डांगेवाडी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.विविध कार्यकारी सोसायटीच्या नवनियुक्त चेअरमन व व्हा.चेअरमन तसेच संचालक मंडळाचे अभिनंदन मा.आ.आप्पासाहेब राजळे, आ.मोनिकाताई राजळे,जि.प.सदस्य राहुल राजळे यांनी केले आहे.तसेच
नवनियुक्त कार्यकारिणीचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.