पाथर्डी येथे भूमिगत गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ
पाथर्डी- प्रतिनिधी
खासदार डॉ. सुजय विखे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत तसेच आमदार मोनिका राजळे यांच्या सहकार्याने आणि अभय आव्हाड यांच्या विशेष प्रयत्नांतून पाथर्डी शहरातील धामणगाव रस्ता लगत माणिकदौंडी चौक ते भगवाननगर रस्ता भूमिगत गटार कामाचा शुभारंभ पार पडला.
यावेळी नगरसेवक प्रसाद आव्हाड, देवराव भोईटे, रामदास नाना गर्जे, वसंतराव खेडकर, बन्सी नागरे, संजय शेटे, गौरव इजारे, बादल पलाटे, अनिल आठरे, प्रदीप वारुळकर, अजय पालवे, राहुल तरवडे, अरविंद जुजगर, उमेश सुपेकर, बाबासाहेब आव्हाड, आश्रुबा पवार, राहुल शिरसाट, शेखर बांगर, सुमित तरवडे, सतिष डोळे, संजय बडे, मनोज ढाकणे, शिंदे काका, धनंजय कुलकर्णी, रविंद्र खंडागळे, सुदर्शन खेडकर, रवी भोईटे, बब्बू इनामदार, आदी नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी शहरातील नागरिकांनी विकासकामांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच देवराव भोईटे यांची माळी बाभूळगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान केला.