महाराष्ट्र
सिंगलफेज भारनियमन बंद करा- अविनाश पालवे
By Admin
सिंगलफेज भारनियमन बंद करा- अविनाश पालवे
पाथर्डी प्रतिनिधी:
थ्री फेज लाईटच्या नंतर येणाऱ्या सिंगलफेज लाईट मधील भारनियमन बंद करा, या मागणीसाठी मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिरसाटवाडीचे सरपंच अविनाश पालवे यांच्या नेतृत्वाखाली शिरसाटवाडी येथील गणपती मंदिरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी अविनाश पालवे म्हणाले की, एस डी टी फिडर मधून थ्री फेज बंद झाल्यावर सिंगल फेज लाईट दिली जाते, पण महावितरण कडून सकाळी ३ तास व रात्री ३ तास भारनियमन केले जात आहे. या फिडरवर प्रामुख्याने मोहोटा , मोहरी , शिरसाटवाडी , रांजणी , केळवंडी , माणिकदौंडी , पिरेवाडी , जाटदेवळे , बोरसेवाडी , चितळवाडी , कोठेवाडी , लांडकवाडी , आल्हणवाडी , घुमटवाडी , पत्राचा तांडा , धनगरवाडी या डोंगराळ भागातील गावांचा समावेश आहे. या गावांतील वस्त्यांना थ्री फेज मधील सिंगल फेज दिली जाते. सध्या बिबट्या याच डोंगरपट्ट्यात दिसतो. रात्री अंधार असल्याने भीतीचे वातावरण आहे. तसेच रात्री होणारे भारनियमन हे ७ ते ११ वाजेपर्यंत असल्याने ही वेळ महिलांना स्वयंपाक करण्याची , जेवणाची , मुलांच्या अभ्यासाची , जनावरांच्या धारी व चारापाण्याची असते यामुळे जनतेला भारनियमनाचा त्रास सहन करावा लागतो. हे भारनियमन त्वरित बंद करा, अशी मागणी अविनाश पालवे यांनी केली.
आंदोलनस्थळी उपस्थित असलेले महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन माळी व सहाय्यक अभियंता मयूर जाधव यांनी येत्या दोन दिवसात शनिवारपासून होणारे भारनियमन बंद करू, असे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलन यशस्वी होऊन भारनियमन बंद होणार असल्याने सर्व उपस्थित महिला व ग्रामस्थांनी सरपंच अविनाश पालवे यांचे कौतुक करत आभार मानले.
या ठिय्या आंदोलनात मनसे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, अशोक आंधळे, सुनील पवार जाटदेवळे, सरपंच अंकुश आठरे , पप्पू सानप, संदीप शिरसाट, संजय घुले , राहुल घुले ,सखाराम ढाकणे, अंबादास शिरसाट, अशोक फुंदे, गणेश ढाकणे, शिवनाथ ढाकणे, नवनाथ ढाकणे, सचिन ढाकणे, शिवाजी घुले, अंकुश शिरसाट, जिजाबा कोंगे, सिताराम कोंगे यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Tags :
3886
10