महाराष्ट्र
रस्त्यावर वाहतूकीच्या नियमात 1 एप्रिल पासून बदल होणार
By Admin
रस्त्यावर वाहतूकीच्या नियमात 1 एप्रिल पासून बदल होणार
नगर सिटीझन live सिटीझन live टिम प्रतिनिधी
सरकारने रस्ते अपघातातील क्लेममध्ये होणारा वेळ पाहता नियमात बदल केला आहे. नवे नियम येत्या 1 एप्रिल 2022 पासून देशभरात लागू केले जाणार आहेत. त्यामुळे क्लेम मिळण्यास सोप्पे होणार आहे. परंतु नव्या नियमानुसार इंन्शुरन्सशिवाय गाडी चालवल्यास 2 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा 3 महिन्याचा तुरुंगवास होण्यासह दोन्ही शिक्षा सुद्धा होऊ शकतात.
दुर्घटना दावा न्यायाधिकरण (एमएसीटी) च्या क्लेमसाठी तत्काल तोडगा काढण्यसाठी विविध हितधारकांसाठी वेळ-मर्यादेसह रस्ते अपघाताचा सविस्तर तपास, सविस्तर अपघाताचा रिपोर्ट आणि त्याच्या रिपोर्टिंगची प्रक्रिया अनिवार्य करण्यासाठी एक अधिसूचना जाहीर केली आहे.
भारतात रस्ते अपघात झाल्यानंतर त्याच्या इंन्शुरन्सच्या क्लेमध्ये नेहमीच उशिर होत असल्याचे दिसून येते. हेच प्रकरण आता गांभीर्याने घेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक अधिसुचना जाहीर केली आहे.
फर्स्ट पार्टी इंन्शुरन्स 50 टक्के क्लेम: हा सुद्धा फर्स्ट पार्टी इंन्शुरन्स असतो. पण यामध्ये काही नियम आणि अटी असतात. त्यानुसार तुम्हाला क्लेम हा कंपनीकडून 50 टक्के दिला जातो आणि उर्वरित 50 टक्के खर्च हा तुम्हाला म्हणजेच चालकाला करावा लागतो. विमा हा मालक आणि ड्रायव्हरसाठी अनिवार्य आहे.
Comprehensive Insurance घेतल्यास रोड एक्सीडेंट कवरला 15 लाख रुपयांपेक्षा अधिक वाढवता येते. तर थर्ड पार्टी इंन्शुरन्समध्ये अनिवार्य दुर्घटना बिमा 15 लाखापर्यंतच मिळतो
फर्स्ट पार्टी इंन्शुरन्स: फर्स्ट पार्टी इंन्शुरन्स हा Zero Depth सह केला जाऊ शकतो. त्यामध्ये सर्व गोष्टी समाविष्ट होतात. जसे तुमची गाडीचे मोठे नुकसान झाले किंवा तुम्हाला जखमा झाल्या अथवा समोरच्या गाडीचे नुकसान झाले या सर्व गोष्टींचा इंन्शुरन्स यामध्ये समाविष्ट करण्यात येतो. याचा क्लेम थेट कंपनी तुम्हाला देते.
ऐवढेच नव्हे तर तुमची गाडी चोरी झाल्यास किंवा डॅमेज झाल्यास तरीही कंपनीच्या क्लेममधून तुम्हाला पैसे मिळू शकतात. जिरो डेप्थ असणारे इंन्शुरन्स तुम्ही वर्षभरात दोन वेळा क्लेम करु शकता.
Tags :
8600
10