विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या;या शाळेतील घटना शिक्षकांकडून घेतली ही परवानगी
By Admin
विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या; शाळेतील घटना शिक्षकांकडून घेतली ही परवानगी
अहमदनगर- प्रतिनिधी
शेवगाव शहरातील नेहमी गजबजलेला मिरी रस्त्यावरील आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविदयालयात अकरावी काँमर्समध्ये शिक्षण घेणा-या आदेश विजय म्हस्के ( वय-१८) राहणार पवार वस्ती, शेवगाव या विदयार्थ्याने वर्गामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली.
हा प्रकार आज गुरुवार ता.२५ रोजी सकाळी आठ वाजता विदयार्थी वर्गात आले असता शेजारच्या वर्गात गळफास घेतल्याचे आढळून आले.
घटनेची माहिती विदयालयाचे प्राचार्य करमसिंग वसावे यांनी पोलीसांना दिली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, काल बुधवार ता.२४ रोजी अकरावी काँमर्समध्ये शिक्षण घेणारा आदेश म्हस्के हा महाविदयालयात नेहमीप्रमाणे आला.दुपारी १२ वाजता महाविदयालय सुटल्यानंतर तो विदयार्थ्यांबरोबर घरी निघून गेला. घरी गेल्यानंतर जेवन करुन दोन तीन दिवस शाळेत येणार नाही. अशी शिक्षकांकडून परवानगी घेवून येतो असे आई लक्ष्मीबाई यांना सागून तो घरामधून बाहेर पडला.
बाहेर जातांना त्याने त्याचा मोबाईल घरीच ठेवला व आईचा स्कार्प संगती घेवून गेला. मुलगा रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने आई व नातेवाईकांनी परीसर व महाविदयालयात जावून शोध घेतला मात्र तो सापडला नाही. त्यामुळे आई लक्ष्मीबाई यांनी काल बुधवार ता.२४ रोजी रात्री ११ वाजता मुलगा हरवल्याची शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविदयालयामध्ये दुस-या मजल्यावर दोन वर्ग असून एक बंद तर एका वर्गात ११ वीचा वर्ग भरतो. आज गुरुवार ता.२५ रोजी सकाळी आठ वाजता महाविदयालयात नेहमीप्रमाणे विदयार्थी वर्गात आले. काही विदयार्थ्यांना शेजारच्या बंद वर्गात कोणी तरी स्कार्पच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. प्राचार्य, उपप्राचार्य व इतर शिक्षकांनी खात्री करुन पोलीसांना माहिती दिली.
त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पो.ना. अभिषेक बाबर, रामहरी खेडकर हे घटनास्थळी दाखल झाले. विदयार्थ्यांच्या व नातेवाईकांच्या समक्ष पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामिण रुग्णालयात पाठवला. त्याच्या मागे आई व तीन बहिणी आहेत.
याबाबत मयताचा चुलतभाऊ संतोष बाबासाहेब म्हस्के यांच्या फिर्यादीवरुन पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पो.ना. अभिषेक बाबर करीत आहेत.