महाराष्ट्र
कासार पिंपळगाव सोसायटी निवडणूक 9 जागेसाठी 12 उमेदवार रिगंणात; 4 जागा बिनविरोध
By Admin
कासार पिंपळगाव सोसायटी निवडणूक 9 जागेसाठी 12 उमेदवार रिगंणात; 4 जागा बिनविरोध
सोसायटी निवडणूक राजकीय वातावरण तापले
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या आ.मोनिकाताई राजळे यांच्या गावातील विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक कार्यक्रम सुरू असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक साठी सर्व जागा बिनविरोध करण्यास दोन्ही पॕनल चे कार्यकर्ते यांना अपयश आले.
9 जागेसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने
निवडणूक होणार आहे.अशी माहीती निवडणूक निर्णय अधिकारी डी.डी.पारधे यांनी दिली.
विविध कार्यकारी सोसायटी कासार पिंपळगाव निवडणूक साठी 13 जागेसाठी 31 व्यक्तीनी अर्ज दाखल केले होते.यामुळे गावामध्ये अर्ज भरण्यापासून तर अर्ज माघारी घेण्याचा शेवटच्या दिवसापर्यत अर्ज भरणा-या व्यक्तीना धाकधूक वाटत होती.नेमकी अर्ज कोणाचा राहणार?अशा प्रकारे अर्ज माघारी घ्यायच्या शेवटच्या दिवसअखेर 19 व्यक्तीनी आपले अर्ज माघे घेत निवडणूकीतून माघार घेतली.
काही जागा बिनविरोध झाल्या असून निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे -
महीला राखीव मतदार संघ- सौ.पद्माबाई भिवसेन देशमुख,सौ.मनिषा मुकुंद राजळे
इतर मागास प्रवर्ग - सदाशिव केरुबापू तुपे
विमुक्त जाती-भटक्या जमाती मतदार संघातून आप्पासाहेब नाथा शिरसाठ हे विद्यमान संचालक निवडून आले आहेत.
तसेच सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातील 8 जागेसाठी 10 उमेदवार आणि अनुसुचित जाती/ जमाती मतदार संघातील 1 जागेसाठी 2 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
यामुळे अशा 9 जागासाठी दि.9 रोजी मतदान होणार असून गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातील 8 जागेसाठी सुनिल हौसराव राजळे,विनायक माणिक भगत,दिलीप रखमाजी राजळे, वसंतराव परसराम भगत, विक्रम बलभिम राजळे,व्दारकानाथ विठ्ठल म्हस्के, बाळासाहेब रामभाऊ कवळे, संभाजी गोविंद राजळे असे एकूण 10 उमेदवार रिगंणात आहेत.तसेच अनुसुचित जाती/जमती मतदार संघातील 1 जागेसाठी कांतिश चंद्रभान तिजोरे आणि सुरेश विश्वनाथ तिजोरे असे दोन उमेदवार रिगंणात आहेत.
यामुळे येत्या काही दिवसात गावातील राजकारण चांगलेच तापले असून शेवगाव-पाथर्डी या दोन्ही तालुक्याचे लक्ष या सोसायटी निवडणूकीवर लागले आहे.
Tags :
93
10