पाथर्डी तालुका कलाशिक्षक संघटनेची कार्यकारिणी जाहीर
तालुकाध्यक्षपदी संजय ससाणे, सचिव किशोर जगताप
पाथर्डी- प्रतिनिधी
अहमदनगर कला शिक्षक संघटनेच्या पाथर्डी शाखेच्या तालुकाध्यक्षपदी संजय ससाणे यांची तर सचिवपदी किशोर जगताप यांची नुकतीच नियुक्ती जिल्हाध्यक्ष संजय पठाडे यांच्याकडून करण्यात आली.
अहमदनगर कला शिक्षक संघाच्यावतीने तिसगाव येथील वृद्धेश्वर हायस्कूल मध्ये तालुका कला शिक्षकांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत तालुक्यातील नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष संजय पठाडे होते.
या सभेत कला विषयातील विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. कला शिक्षकांनी आपल्या अडचणी मांडल्या असता जिल्हाध्यक्षांनी त्यावर मार्गदर्शन केले. संजय पठाडे यांची राज्य रेखाकला परीक्षा मंडळावर निवड झाल्याबद्दल कला शिक्षकांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
नवनियुक्त तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे: कार्याध्यक्ष- संजय गटागट, खजिनदार- लक्ष्मण देशमुख, उपाध्यक्ष- गणेश सरोदे, सहसचिव- किसन आठरे, महिला विभाग प्रमुख- नक्षमा खान, सदस्य- निलेश गनगले, दीपक राठोड, प्रसिद्धीप्रमुख- विजय गुंजाळ, अंबादास लाड या सर्व पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांना नियुक्तपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सुनिल दानवे, रवींद्र गायकवाड यांची यावेळी मार्गदर्शनात्मक भाषणे झाली.
याप्रसंगी जिल्हा सचिव रवींद्र गायकवाड, जिल्हा सहकार्याध्यक्ष सुनिल दानवे, उपाध्यक्ष आत्माराम दहिफळे, समन्वयक महेश साखरे, पारनेर तालुकाध्यक्ष कानीफ गायकवाड आदींची उपस्थिती होती.
आत्माराम दहिफळे यांनी प्रास्ताविक केले. संजय ससाणे यांनी सूत्रसंचालन केले तर किशोर जगताप यांनी आभार मानले.