अफगाणी धर्मगुरु हत्या प्रकरण; अहमदनगर पोलिसांनी लपून बसलेल्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अफगाणिस्तानमधून महाराष्ट्रात आलेले मुस्लीम धर्मगुरू ख्वाजा सय्यद चिश्ती यांची मागील महिन्यात गोळ्या झाडून हत्या केली ( Afghan origin shot dead case ) होती. याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी अफगाणी धर्मगुरू हत्या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली ( ahmednagar police nabbed three accused Afghan origin shot dead ) आहे.
अहमदनगर - अफगाणिस्तानमधून महाराष्ट्रात आलेले मुस्लीम धर्मगुरू ख्वाजा सय्यद चिश्ती यांची मागील महिन्यात गोळ्या झाडून हत्या केली ( Afghan origin shot dead case ) होती. याप्रकरणी नाशिक पोलीस आरोपींचा शोध घेत होते. यासाठी वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली होती. मात्र, शेवटी अहमदनगर पोलिसांनी याप्रकरणी मोठी कारवाई केली ( ahmednagar police nabbed three accused Afghan origin shot dead ) आहे.
अहमदनगर पोलिसांनी अफगाणी धर्मगुरू हत्या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. संतोष ब्राह्मने, गोपाळ बुरगुले, विशाल पिंगळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत.
3 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा अहमदनगर - मनमाड येथील एका हॉटेलवर काही अज्ञात इसम जेवण्यासाठी आले असून, त्यांच्याकडे हत्यारे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आणि त्यांच्या पथकाने हॉटेलजवळ सापळा रचत तिन्ही आरोपींना अटक केली.
दरम्यान, आरोपींना अटक करण्यासाठी येवला पोलिसांनी अनेक जिल्ह्यात पथके ही रवाना केली होती. आता नगरमधून आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींचा ताबा आता नाशिक पोलिसांकडे देण्यात येईल. आरोपींच्या चौकशीत हत्या करण्यामागचं नेमकं कारण काय आहे?, याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.