महाराष्ट्र
जवखेडे विद्यालयातील कलादालनात भव्य चित्रकला प्रदर्शन
By Admin
जवखेडे विद्यालयातील कलादालनात भव्य चित्रकला प्रदर्शन
पाथर्डी - प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पाथर्डी तालुक्यातील श्री कानिफनाथ माध्य. व कै. रघुनाथ पा. वाघ उच्च माध्य. विद्यालय जवखेडे [ खा.] येथील कलादालनात भव्य चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
दि. १५ ऑगस्ट रोजी संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव वाघ, विठ्ठलराव नेहूल, नजमुद्दीनभाई शेख, चारुदत्त वाघ ( अध्यक्ष, शा. व्य. समिती ), शिवाजीराव नेहूल ( उपाध्यक्ष ), पोपटराव आंधळे, समसुद्दीन शेख, शिवाजीराव वाघ, प्राचार्य नेहूल सर व कला शिक्षणप्रेमी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
देशभक्तीपर व वास्तव विषयांवर मुलांनी अप्रतिम चित्रे रेखाटली व रंगविली होती. काही पेन्सिल रेखाटने दर्जेदार होती.सुमारे २११ चित्रांचे प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. इ.५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कु. प्रतिक्षा जाधव , कु. वैष्णवी नेहूल , कु. नाजिया काद्री , कु. समृद्धी मतकर यांच्या नेत्रदिपक कलाकृती पाहून मान्यवरांनी त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे दिली. सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी जेष्ठ कलाशिक्षक तथा कलाशिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय ससाणे व राजेंद्र मतकर यांनी परिश्रम घेतले. हे प्रदर्शन दि. २० / ०८ / २०२२ पर्यंत सर्वांसाठी खुले आहे. तरी परिसरातील कलाप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे अवाहन पर्यवेक्षक श्री. गिरी सर यांनी केले.
७५ या अंकातील विद्यार्थी बैठक व्यवस्था , भव्य प्रभातफेरी , देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम ,आकर्षक सजावट, सुंदर फलकलेखन, विद्यालय परिसर स्वच्छता व सुशोभिकरण अशा चैतन्यमय वातावरणात अमृत महोत्सवाची सांगता समूह राष्ट्रगीताने झाली.
याप्रसंगी सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच समस्त ग्रामस्थ , पालक व माजी विद्यार्थी प्रचंड संख्येने उपस्थित होते.
जि.प. प्रा.शाळेचे विद्यार्थी प्रदर्शन पाहून खूप आनंदी झाले होते. संस्थेचे सर्व पदाधिकारी , मान्यवर व उपस्थित सर्वांनी प्रदर्शनातील सर्व उपक्रमांचे कौतुक केले.
Tags :
503
10