महाराष्ट्र
2891
10
पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करावेत-
By Admin
पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करावेत- ॲड. प्रताप ढाकणे
विविध पक्षाचे पदाधिकारी व व्यापारी संघटनेच्या वतीने पोलीस दलाचा सन्मान
पाथर्डी- प्रतिनिधी
वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ जशी आम्ही मोर्चा काढून टीका करतो,तशाच प्रकारे गुन्ह्याचा शोध लागल्यानंतर आम्ही पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान देखील करतो.आगामी काळात देखील पाथर्डी पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करावेत.आम्ही सर्व पक्षिय नेते कार्यकर्ते तुमच्या सोबत राहू,अशी ग्वाही राष्ट्रवादीचे नेते अॅड. प्रताप ढाकणे यांनी दिली.
शहरातील ज्येष्ठ सराफ व्यावसायिक राजेंद्र उर्फ बंडूशेठ चिंतामणी यांच्यावर चोरीच्या उद्देशाने जीवघेणा हल्ला केला होता.या हल्ल्यात चिंतामणी थोडक्यात बचावले.मात्र यामुळे शहरातील व्यापारी पेठेत मोठी दहशत निर्माण झाली होती.दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व व्यापारी व नागरिकांनी पोलीस स्टेशनवर सर्वपक्षीय मोर्चा काढला होता.याची दखल घेत पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेत तीन आरोपींना अटक केली.याबद्दल पाथर्डी पोलिसांचा समस्त व्यापारी संघटना,सुवर्णयुग परिवार ट्रस्टच्या व वैयक्तिकरित्या सन्मान करण्यात आला.या प्रसंगी अँड.ढाकणे बोलत होते.
यावेळी अभय आव्हाड,अशोक गर्जे,नंदकुमार शेळके,शिवशंकर राजळे,बंडू बोरुडे,चंद्रकांत भापकर,सिताराम बोरुडे,राजेंद्र शेवाळे,संतोष भागवत
,बाळासाहेब जिरेसाळ,राजेंद्र गुगळे,राजेंद्र कोटकर आदी व्यापारी उपस्थित होते.
यावेळी सर्व उपस्थितांनी पोलीस दलाला शुभेच्छा दिल्या.शहर अथवा तालुक्यामध्ये कुठल्याही जातीचा अथवा कुठल्याही पक्षाचा गुन्हेगार असल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी.याबाबत कुठल्याही राजकीय पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करू नये. तसेच पोलिसांनी देखील कोणालाही न जुमानता आरोपीस सहकार्य करू नये.अशा भावना सर्व उपस्थितांनी व्यक्त केल्या.यावेळी पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण,सहाय्यक निरीक्षक प्रवीण पाटील,रामेश्वर कायंदे, उपनिरीक्षक सचिन लिंबकर,श्रीकांत डांगे,लक्ष्मण पवार,के के कराड,भगवान सानप,संदीप बडे,नारायण कुटे,अतुल शेळके,अनिल बडे,राहुल तिकोने,ईश्वर बेरड,सागर मोहिते,ज्ञानेश्वर रसाळ,आप्पासाहेब वैद्य आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना चव्हाण अगदी भाऊक झाले होते.ते म्हणाले की, पोलीस देखील मनुष्यच असतो.कुठलाही गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना नागरिकाकडून जलद गतीने माहिती मिळाल्यास गुन्हा व गुन्हेगार उघडकीस येण्यास मोठी मदत होते.यासाठी आगामी काळात सर्वांनी पोलीस दलाला सहकार्य करावे.शहरासह तालुक्यातील संपूर्ण गुन्हेगारी मोडीत काढू.
Tags :

