नगर पंचायत समिती : सभापतीपदी सुरेखा गुंड तर उपसभापतीपदी दिलीप पवार
नगर सिटीझन live टिम-
नगर तालुका पंचायत समितीत सभापतीपदी शिवसेनेच्या सुरेखा गुंड तर उपसभापतीपदी सेनेचे डॉ. दिलीप पवार यांची बिनविरोध निवड झाली. विरोधी भाजपच्या सदस्यांनी मतदान प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याने निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
नगर तालुका पंचायत समितीच्या मावळत्या सभापती कांताबाई कोकाटे व उपसभापती रविंद्र भापकर यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने पंचायत समितीत सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रिया पार पडली. नगर पंचायत समितीत शिवसेना - काँग्रेसचे ८ तर भाजपचे ४ सदस्य आहेत. विरोधकांकडुन दगाफटका नको म्हणुन सेनेने ८ ही सदस्य सुरक्षित ठेवले होते.
आज सकाळी सभापतीपदासाठी सेनेकडुन सुरेखा गुंड यांनी तर उपसभापतीपदासाठी डॉ. दिलीप पवार यांचे एकमेव अर्ज दाखल झाले.
यामुळे सभापतीसाठी गुंड यांचा व उपसभापतीपदासाठी पवार यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने या दोघांची बिनविरोध निवड जाहिर करण्यात आली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, प्रकाश कुलट, प्रविण कोकाटे यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.