महाराष्ट्र
10815
10
समाजव्यवस्थेला काही लोकांकडून ग्रहण लावण्याचा प्रयत्न -सुनिल पाखरे
By Admin
समाजव्यवस्थेला काही लोकांकडून ग्रहण लावण्याचा प्रयत्न -सुनिल पाखरे
हनुमानगड येथे समाजातील विविध विषयावर महत्त्वपूर्ण बैठक
पाथर्डी प्रतिनिधी:
तालुक्यातील हनुमानगड येथे २१ डिसेंबर रोजी समाज बांधवाची समाजातील विविध विषयांवर विचार-विनिमय करण्यासाठी महत्वपूर्ण बैठक पार पाडली.सदर बैठकीमध्ये समाज व्यवस्थेपुढे असणारे मुलभूत प्रश्न, तंटामुक्त समाजअभियान,शासनाकडून मिळणाऱ्या सर्व नागरी सुविधा तसेच समाज्यातील वंचित, शोषित,पिडीत कुटूबाच्या भविष्याच्या वाटचाली व पर्यायी व्यवस्थेबाबत विचार विनिमय करण्यात आला.
कष्ट हे सर्वश्रेष्ठ धन समजुन ऊसाच्या थळात घाम गळणाऱ्या श्रमिक समाज बांधवाच्या दामाच्या जीवावर धर्म सत्ता व राज सत्ता पोसली जाते.समाज व्यवस्था शोषली जात असेल तर तिला वेळीच पायबंध घातला पाहिजे.समाज्यात काही अप्रवृत्ती उदयाला येऊ पाहत आहेत.मुळात सर्व स्तरात सुजलाम सुफलाम असलेल्या समाजव्यवस्थेला काही आमिष दाखवुन त्याचा आधार घेऊन स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचे काम चालु आहे व याच पोळीचा नैवद्य दाखवुन समाज्यात दुफळी माजविण्याचे काम करणाऱ्या समाज कंटकांना सामाज्याचे काही देणे घेणे नाही.स्वयंभु व स्वायत्तता पुर्ण असलेल्या सामाज्यावर भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या संपत्तीची साखर पेरणी करू नये.साधु संतांचे आशिर्वाद,पदरी पुण्य सग्या-सोयारांचे साख्य असणारे व समाज व्यवस्थेला कुटुंब समजणारे काही प्रस्त व जाणकार मंडळी आहे.ज्यांचे समाज व्यवस्थेमध्ये भरीव योगदान आहे,काळ्या पैशातून कन्यादान करण्याचे काम कौतुकास्पद नाही,त्यांनी समजाला शहाणपणा शिकवू नये.सामाज्याचे भविष्य आणि दाइत्व स्वीकारलेले खरे लोकसमाज हित चिंतक आहेत.त्यामुळे त्यांनी चले-जावचा मार्ग पत्करावा,असा इशारा या बैठकीतून देण्यात आला.
बैठकीला राजाभाऊ दगडखैर,प्रा.सुनिलराव पाखरे ,नागनाथ गर्जे,प्रदिप घोडके,महादेव दहिफळे,रंगनाथ खरमाटे,विजय आव्हाड,भास्कर दराडे,भाऊराव खाडे,सचिन आव्हाड,गणेश घुले,बाळासाहेब धायतडक,गणेश दहिफळे व स्वामी सोमनाथ बन आदी जाणकार मंडळी उपस्थित होते.
Tags :
10815
10





