संजय बडे पाथर्डी तालुक्यातील पहिले एस. आर. मानकरी
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील येळी येथील रहिवाशी हेड कॉन्स्टेबल संजय बडे यांनी सायकलिंग क्षेत्रातील सर्वात मानाचा समजला जाणारा एस. आर. (सुपर राउंडर) हा पुरस्कार पटकावला आहे.
संजय बडे हे एस. आर. पुरस्कार मिळवणारे पाथर्डी तालुक्यातील पहिले सायकलपटू ठरले आहेत. संजय बडे हे शेवगाव सायकल क्लबचे सदस्य आहेत. त्यांनी प्रथम २०० कि.मी., ३०० कि.मी., ४०० कि.मी. व ६०० कि.मी., असा १५०० किलोमीटरचा सायकल प्रवास निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे बीआरएम चे आव्हान पूर्ण करून हा सन्मान मिळवला आहे.
यावर्षी शेवगाव सायकल क्लबच्या आठ सदस्यांनी एकाच वेळी एस. आर. होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. शेवगाव सायकल क्लबचे सायकलपट्टू पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय बडे, डॉ. प्रदीप उगले, डॉ. स्मिता उगले, डॉ. मुकुंद दारकुंडे, बंडू दहातोंडे, निळकंठ लबडे, आबासाहेब नेमाने, सुभाष पवार हे एस. आर. हा बहुमान मिळवणारे मानकरी आहेत.
या यशासाठी शेवगाव सायकल क्लबचे अध्यक्ष विनोद ठाणगे, सदस्य हरीश शिंदे, निलेश केवळ, सुनिल गवळी, कैलास जाधव, डॉ. संजय लड्डा, प्रा. गजानन लोंढे, भारत दहिवाळकर, नानासाहेब देशपांडे, वल्लभ लोहिया, प्रशांत सुपेकर, संतोष भागवत, यशवंत तुपे या सदस्यांचे योगदान कामी आले.