महाराष्ट्र
75421
10
कोरडगाव येथे पीएसआय गोकुळ देशमुख भव्य गुणगौरव समारंभ
By Admin
कोरडगाव येथे पीएसआय गोकुळ देशमुख भव्य गुणगौरव समारंभ
पाथर्डी प्रतिनिधी:
सुसंस्कृत मुले ही पालकाची पुण्याई असून मुले घडवण्यात पालकाची भूमिका महत्त्वाची असते,असे प्रतिपादन रमेश जोशी यांनी कोरडगाव येथे मार्केट कमिटी संचालक मधुकर देशमुख यांचे चिरंजीव गोकुळ मधुकर देशमुख याची पीएसआय पदी नियुक्ती झाल्यामुळे गावकऱ्यामार्फत आयोजित भव्य गुणगौरव समारंभात बोलतांना केले.
यावेळी कार्यक्रमास वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक नारायण काकडे, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, वामन काकडे, गहिनीनाथ बोंद्रे, अरुण मुखेकर ,किशोर देशमुख, बाळासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.
जोशी पुढे बोलतांना म्हणाले की, आई वडील मुलांसाठी आपले सर्व आयुष्य पणाला लावतात, काबाड कष्ट करून भवितव्याचा विचार करतात, मुलांनी मात्र आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून आपले भविष्य उज्वल केल्यास कष्टाची चीज होते, हीच त्यांच्या आयुष्याची कमाई असते. कोरडगाव परिसरात गेल्या एक वर्षात बबन मुखेकर यांचे चिरंजीव सागर मुखेकर याने नुकताच राज्यसेवा परीक्षेत यश मिळवले.तसेच हिना कचरे, गोकुळ काकासाहेब देशमुख, गोकुळ मधुकर देशमुख हे तिघेही पीएसआय झाले आहेत. त्यामुळे या परिसराचे, गावाचे व कुटुंबाचे नवलौकिक वाढवण्यात मदत झाली आहे. परिसरातील विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन आपले भवितव्य उज्वल करण्यासाठी प्रयत्न करावे ,असे यावेळी बोलताना ते म्हणाले.
या कार्यक्रमास औरंगपूरचे उपसरपंच ईश्वर देशमुख, विष्णू आंधळे, बप्पासाहेब देशमुख, आकाश मस्के ,गोरक्ष मस्के आदी उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षेतून अधिकारी पद मिळवणे, हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. या प्रवासात यश अपयश ही वाट्याला येतच असतात, परंतु यावर मात करण्यासाठी दिद्द, चिकाटी आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा ही आपल्याला कुटुंबाकडून आणि मित्रांकडून मिळत असते.या यशामध्ये त्यांचे देखील योगदान आहे
-गोकुळ मधुकर देशमुख [पीएसआय
Tags :

