ट्रॅक्टरच्या धडकेत चिमुकल्याचा मुत्यु
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील कांबी येथे काल दि, ९ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास दुर्दैवी घटना घडली, हातगाव रोड वरती राहणारे रामेश्वर गोरे यांचा पुतण्या व विश्वास सिताराम गोरे याचा ७ वर्षाचा मुलगा चि, गौरेश गोरे यास भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडून टाकले व ट्रँक्टरवाला ट्रॅक्टर घेऊन सुकळी रस्त्याकडे निघून गेला.
ही घटना गोरे कुटुंबातील रामेश्वर गोरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुतण्यास गावातील दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी सांगितले व ते स्व:हा ट्रॅक्टरचा चा पाठलाग करण्यासाठी गाडी व गेले असता ट्रॅक्टर वाल्याचा स्पिड खुप असल्याने व रस्ता मध्ये धुळ उडत असल्यामुळे तो त्यांना जाऊ पर्यत सुकळी वस्ती वर जाऊन ट्रॅक्टर सोडुन शेता शेता नी पळाला. अंधार असल्याने तो त्यांना सापडला नाही. तोपर्यंत कुंटुबातील व्याक्तीनी गौरेश गोरे यास गावातील डॉक्टर कडे नेले असता त्याला जबर मार लागल्याचे लक्षात आले असता त्यांनी पुढील उपचारासाठी शेवगाव हलविण्यास संगितले. शेवगाव ला घेऊन गेल्यावर जागेवर जास्त प्रमाणात मार लागल्यामुळे तो तेथेच मुत्यु झाल्याचे डॉक्टर कडुन सांगितले गेले व गौरेश गोरे यास मृत घोषित करण्यात आले. गौरेश मृत झाल्याची बातमी कांबीत पसरली व त्या गुणी चिमुकल्याची ग्रामस्थांकडून हळहळ तळतळ व्यक्त करण्यात आली व दि. १० रोजी १ वा, च्या सुमारास कांबी येथील स्मशानभूमीत त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. विश्वासनंद वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची अध्यक्ष कृष्णा महाराज कुऱ्हे यांचा तो मेव्हणा होता .