महाराष्ट्र
17984
10
तालुकास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात श्री तिलोक जैन विद्यालय विद्यार्थ्यांचे यश
By Admin
तालुकास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात श्री तिलोक जैन विद्यालय विद्यार्थ्यांचे यश
पाथर्डी प्रतिनिधी:
५१ वे तालुकास्तरीय विज्ञान - गणित प्रदर्शन शहरातील श्री विवेकानंद विद्यामंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.सदर प्रदर्शनात श्री तिलोक जैन विद्यालयातील पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्वच विद्यार्थ्यांची उपकरणे प्रदर्शनात अतिशय लक्षवेधी ठरली.
यामध्ये इयत्ता सहावी ते आठवी विज्ञान या गटात चि .ओंकार शहादेव सोनवणे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक तर इयत्ता नववी ते बारावी विज्ञान या गटात कु. ईश्वरी विक्रम हराळ या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश प्राप्त केले आहे. चि.ओंकार यांने तयार केलेली बहुउपयोगी खुर्ची व कु .ईश्वरी हिने तयार केलेली वृद्धाचा आधारस्तंभ - बहु उपयोगी छत्री या उपकरणाची सर्वांनीच विशेष दखल घेतली. ही दोन्हीही उपकरणे समाजासाठी अत्यंत उपयुक्त असल्याची भावना उपस्थित सर्वांनी बोलून दाखवली.
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक सुनिल कटारिया,सागर नलावडे, विनोद नवले,सचिन काकडे, डॉ . अनिल पानखडे,चंद्रकांत उदागे, जयमाला खाटीक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल या विद्यार्थ्यांचा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, वित्त व लेखा अधिकारी रमेश गांगर्डे, गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, गट शिक्षणाधिकारी अनिल भवार, बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी . पी .ढाकणे, विवेकानंद विद्यामंदिरचे मुख्याध्यापक शरद मेढे,पर्यवेक्षक संपत घारे, समन्वयक ज्ञानेश्वर गायके, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल कटारिया, गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष राजू पवार, दोन्ही संघटनांचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत यथोचित गौरव करण्यात आला.
या अतिशय भरघोस अशा यशाबद्दल श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष चंपालालजी गांधी, सचिव सतिश गुगळे, खजिनदार सुरेश कुचेरिया, विश्वस्त धरमचंद गुगळे, डॉ . ललीत गुगळे, राजेंद्र मुथा यासह कार्यकारी व सल्लागार मंडळाचे सर्व सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड,उपप्राचार्य विजयकुमार छाजेड, पर्यवेक्षक दिलावर फकीर, अजय भंडारी, सुधाकर सातपुते यांनी विशेष अभिनंदन केले आहे. यासह शैक्षणिक क्षेत्रातून तिचे सर्वत्र विशेष अभिनंदन होत आहे. कु .ईश्वरी ही विद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक विक्रम हराळ यांची कन्या असून चि. ओंकार शहरातील सुप्रसिद्ध पशुवैद्यकीय तज्ञ डॉ.शहादेव सोनवणे यांचा चिरंजीव आहे.
Tags :
17984
10





