नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करून विविध क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा- प्राचार्य शेषराव पवार
पाथर्डी -प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील श्री आनंद महाविद्यालयाच्या वतीने प्रा.डॉ. मुख्तार शेख यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यास मंडळावर निवड झाल्याबद्दल त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.
पाथर्डी येथील श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ या संस्थेचे श्री आनंद महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. डॉ. मुख्तार शेख यांची नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यास मंडळावर (बी एस ओ)अहमदनगर जिल्ह्यातून बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. शेषराव पवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महावीद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार होते. याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले की, प्राध्यापक मुक्तार शेख यांची रसायनशास्त्र अभ्यास मंडळावर बिनविरोध निवड झाल्याने त्यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचे सोने करण्याची त्यांना संधी उपलब्ध झाली आहे . रसायनशास्त्राचा नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करून विद्यार्थ्याना वेगवेळ्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये आपला ठसा उमटवावा, असे त्यांनी याप्रसंगी प्रतिपादन केले.
यावेळी डॉ. बथूवेल पगारे, प्रा. डॉ. अनिल गंभीरे, प्रा. विकास गाडे, प्रा. डॉ. संजय नरवडे, प्रा. दत्ताराम बांगर, प्रा. दिनकर जयभाये, प्रा. डॉ. नितीन ढूमणे, प्रा. डॉ. जगन्नाथ बर्शिले, डॉ. धीरज भावसार, डॉ. प्रतिक नागवडे, डॉ. इस्माईल शेख, डॉ. जयश्री खेडकर, प्रा. अरूण बोरुडे, प्रा. अश्विनी थोरात सह विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.