साडेतीन हजार गुन्हेगार 'वॉन्टेड'; पोलिसांना देताहेत गुंगारा
By Admin
साडेतीन हजार गुन्हेगार 'वॉन्टेड'; पोलिसांना देताहेत गुंगारा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्ह्यात दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांत तीन हजार 612 आरोपींची 'वॉन्टेड' म्हणून पोलिस दप्तरी नोंद असून, यापैकी 97 आरोपींना फरार घोषित करण्यात आले आहे.
पोलिस शोध घेत असलेल्या आरोपींमध्ये बरेच गुन्हेगार जिल्हाबाहेरील व राज्याबाहेरील असल्याने त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा 'कुरापती' करणार्या गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर आहे.
नगर जिल्ह्यातील 21 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या 20 ते 30 वर्षांपासून घडलेल्या गुन्ह्यांत तीन हजार 612 आरोपींचा शोध पोलिसांना आहे. चोरी, घरफोडी, अपघात, चंदन, अंमली पदार्थ तस्करी, वाहनांच्या चोर्या, लूटमार, हत्येचा प्रयत्न, खून, चेनस्नॅचिंग, विनयभंग, अत्याचार, ठकबाजी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. काही गुन्ह्यांतील आरोपी हे शहर व जिल्ह्याबाहेरचे असल्याने त्यांचा तपास करणे पोलिसांना 'चॅलेंजिंग' बनले आहे. या गुन्ह्यांमध्ये रस्त्याच्या कडेला, पालावर राहणार्या लोकांनी चोर्या, घरफोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशा गुन्हेगारांना अटक करून पोलिस न्यायालयासमारे उभे करतात. परंतु, जामीन मिळाल्यानंतर हे आरोपी जिल्ह्याबाहेर निघून जातात ते पुन्हा सापडत नाहीत. तसेच, पकडण्यात आलेल्या आरोपींकडे आधार, पॅन, मतदान कार्ड अशा कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नसते. त्यामुळे जिल्हा सोडून गेलेले आरोपी नंतर सापडत नाहीत. अशा गुन्हेगारांचा 'वॉन्टेड'मध्ये समावेश होतो.
97 आरोपी फरार
कोतवाली-4, तोफखाना-23, भिंगार-3, नगर तालुका-8, पारनेर-3, एमआयडीसी-2, कर्जत-5, शेवगाव-1, पाथर्डी-3, नेवासा-5, शनिशिंगणापूर-2, श्रीरामपूर शहर-2, राहुरी-5, संगमनेर तालुका-6, संगमनेर शहर-4, अकोले-3, घारगाव-5, कोपरगाव-2, राहाता-5
मृत्यूनंतरही तपास सुरूच
दाखल गुन्ह्यात आरोपीचा मृत्यू झाला तरी त्याचे मृत्यू प्रमाणपत्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पोलिसांचा तपास सुरूच असतो. न्यायालयात प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय तो मरण पावला आहे, हे सिद्ध होत नाही. त्यामुळे अनेक प्रकरणात आरोपीच्या मृत्यूनंतरही तपास सुरूच राहतो.
चार महिन्यांत 64 आरोपी गजाआडस्थानिक गुन्हे शाखेच्या टीमचा विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी जिल्ह्यात सर्वत्र मुक्तसंचार असतो. एखाद्या गुन्ह्याचा तपास असताना 'वॉन्टेड' आरोपी पोलिसांच्या गळाला लागतात. गत चार महिन्यात 'एलसीबी'ने 64 गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिस ठाणेनिहाय 'वॉन्टेड'कोतवाली-102, तोफखाना-145, भिंगार-141, नगर तालुका-138, एमआयडीसी-152, पारनेर-166, सुपा-86, श्रीगोंदा-386,
बेलवंडी-176, कर्जत-267, मिरजगाव-20, जामखेड-116, खर्डा-12, शेवगाव-132, पाथर्डी-131
पोलिस रेकॉर्डवर पाहिजे असलेले व फरार आरोपींचा शोध सुरूच असतो. गेल्या चार महिन्यात 64 आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यात आली आहे.
– दिनेश आहेर, पोलिस निरीक्षक, एलसीबी, नगर
काही गुन्ह्यांमध्ये आरोपी हे जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील असतात. गुन्हा घडल्यानंतर ते जिल्ह्यातून पसार होतात. पाहिजे व फरार आरोपींच्या हालचालींवर नजर ठेवून त्यांना अटक केली जाते.
-चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, कोतवाली
10586
10





